Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

फ्लॅटचे कुलूप तोडून ३ लाखांचे दागिने चोरी

बीडच्या अंबाजोगाईतील राडीत धाडसी चोरी

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोकड असा तीन लाख सात हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी नऱ्हे पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने नऱ्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दारू पिऊन गोेंधळ घालणाऱ्या टोळक्याकडून एकाला मारहाण – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे नऱ्हे भागातील भूमकर चौकात असलेल्या समर्थपूरम सोसायटीत राहायला आहेत. ३० जुलै रोजी तक्रारदार आणि कुटुंबीय हे सदनिका बंद करुन बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी मध्यरात्री सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातील तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, रोकड असा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले. शनिवारी (१ ऑगस्ट) सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज चोरुन नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस हवालदार भोरडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×