पोलीस असल्याची बतावणी करुन ५ लाखांचे दागिने चोरीला

चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पोलीस असल्याची बतावणी करुन चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत ज्येष्ठ नागरिकांकडील पाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. कोथरूड, तसेच पाषाण परिसरात या घटना घडल्या. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कोथरूडमधील पौड रस्ता परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाकडे पोलीस असल्याची बतावणी करुन चोरट्यांनी त्यांच्याकडील ४ लाख आठ हजार रुपयांची सोनसाखळी चोरून नेल्याची घटना रविवारी (३ मे) घडली. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्या आरोपीची २० वर्षांपूर्वी गावातून हकालपट्टी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे सेनापती बापट रस्त्यावरील जनवाडी परिसरात राहायला आहेत. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास ज्येष्ठ नागरिक आणि त्यांची पत्नी दुचाकीवरुन भूगावला निघाले होते. पौड रसत्यावरील जैन लाेहिया आयटी पार्कसमोरील पीएमपी थांब्याजवळ चोरट्यांनी दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिकाला अडवले आणि पोलीस असल्याची बतावणी केली.

या भागात ज्येष्ठांना लुटण्यात येते.तुमच्याकडील दागिने काढून ठेवा, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने त्यांच्याकडील चार लाख रुपयांची सोनसाखळी कागदात बांधून ठेवण्याचा बहाणा केला. त्यानंतर त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून सोनसाखळी लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण तपास करत आहेत.

पाषाण-सूस टेकडी परिसरात ज्येष्ठ नागरिकाकडे बतावणी करुन चोरट्यांनी त्यांच्याकडील सोन्याची अंगठी आणि सोनसाखळी असा एक लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दाेन चोर ट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे बाणेर परिसरात राहायाला आहेत. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ते पाषाण-सूस टेकडीकडे जाणाऱ्या रस्त्याने निघाले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांना अडवले. पोलीस असल्याची बतावणी केली. पाषाण टेकडी परिसरात ज्येष्ठांना लुटण्याच्या घटना घडल्या आहेत, अशी बतावणी करुन चोरट्यांनी त्यांच्याकडील सोनसाखळी आणि अंगठी काढून घेतली. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक मांढरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×