Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

फ्लॅटचे कुलूप तोडून ९ लाखांचे दागिने चोरी

ज्येष्ठ महिलेच्या सदनिकेतून एक लाखांचे दागिने चोरीला

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी ९ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना खडकवासला परिसरात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध नांदेड सिटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे.

‘आखाड पार्टीत तडीपार गुंडाच्या डोक्यात दगड घातला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे खडकवासला रस्त्यावरील वृंदावन क्षितीज सोसायटीत राहायला आहेत. ७ ऑगस्ट रोजी तक्रारदार हे कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाट उचकटून ९ लाख सात हजार रुपयांचे दागिने लांबविले. तक्रारदार हे ९ ऑगस्टला परतल्यानंतर सदनिकेचे कुलूप तुटल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी दागिने चोरुन नेल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पोलीस उपनिरीक्षक डी. डी. सावंत तपास करत आहेत.

रामटेकडीतील ओैद्योगिक वसाहतीत चोरी

हडपसरमधील रामटेकडी ओैद्योगिक असलेल्या खासगी कंपनीतून चोरट्यांनी सौरउर्जा यंत्रणा बसविण्यासाठी लागणारे साहित्य चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत कंपनीतील कर्मचाऱ्याने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेकडी ओैद्योगिक वसाहतीत सनलाईट डेव्हलपर्स ही कंपनी आहे. सौरउर्जा यंत्रणा बसविण्यासाठी लागणारे साहित्य निर्मिती करण्याचे काम या कंपनीत केले जाते. चोरट्यांनी कंपनीच्या आवारातील संरक्षक जाळी तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी ७५ हजार रुपयांचे साहित्य चोरुन नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजितवाड यांनी घटनास्थळी भेट दिली असून, हवालदार राऊत तपास करत आहेत. रामटेकडी ओैद्योगिक वसाहतीतल खासगी कंपन्यांच्या आवारात शिरुन तांब्याची तार चोरुन नेण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×