खराडी बायपास परिसरातील घटना
marathinews24.com
पुणे – Kharadi Bypass Robbery Case : रस्त्याने पायी चाललेल्या जेष्ठ महिलेच्या अंगावर आणि तोंडावर पाणी उडवून त्यांच्या गळ्यातील १० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र, पर्समधील मोबाइल, सोन्याची अंगठी असा मिळून ३८ हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. ही घटना २२ ऑक्टोबरला संध्याकाळी सहाच्या सुमारास खराडी बायपास रोड जवळील चौधरी वस्तीवर घडली आहे. याप्रकरणी ६६ वर्षीय महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाघोली पोलिसांनी चेहर्यावर फुलवले हसू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला चंदननगरमध्ये राहायला असून, २२ ऑक्टोबरला संध्याकाळी सहाच्या सुमारास चौधरी वस्ती परिसरातून पायी जात होती. त्यावेळी चोरट्या महिलेसह दोघांनी जेष्ठ महिलेच्या अंगावर पाणी उडवले. त्यांचे लक्ष विचलित केल्यानंतर तक्रारदार महिलेजवळ येउन गळ्यातील १० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. त्यानंतर महिलेकडील पर्समधून मोबाइल, (Kharadi Bypass Robbery Case) सोन्याची अंगठी असा ३८ हजारांचा ऐवज चोरुन नेला. जेष्ठ महिलेने आरडाओरड करेपर्यंत चोरटे पसार झाले. याप्रकरणी खराडी पोलिसांकडून तपास करण्यात येत असून, सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींचा माग काढला जात असल्याची माहिती दिली आहे. उपनिरीक्षक गणेश घुले तपास करत आहेत.






















