Breking News
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम प्रकल्पांचा आढावाउपमुख्यमंत्र्यांकडून हिंजवडी परिसरातील नागरी व पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा आढावाबोपोडीतील रेडीरेकनरचा कमी असलेला दर वाढविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार पुण्यात विद्यानंद बापट यांच्या मारहाणीचा निषेधदहीहंडी महोत्सवात पुणेकर अनुभवणार ‘दशावतार’पुण्यात गणशोत्सवात चार बेस, चार टॉपची मर्यादापुण्यात विद्यानंद बापट यांना मारहाण, पुणेकरांच्या संतप्त प्रतिक्रियापुणे-पिंपरीत ऑटोरिक्षा भाडेवाढ लागू; रात्रीच्या प्रवासाला २५ टक्के अतिरिक्त भाडेदहीहंडी उत्सवासाठी पुणे शहरातील वाहतुकीत बदलपुण्यात पानटपरी चालकाकडून ३०० रुपये हप्ता; खराडीतील पोलिस निलंबित

स्वर्गीय गंगुबाई संभाजी शिंदे फेस्टिवल 2025 चे उद्घाटन

रास-दांडियाच्या भव्य महोत्सवाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

marathinews24.com

पुणे – स्वर्गीय गंगुबाई संभाजी शिंदे फेस्टिवल 2025 चा पहिला दिवस अत्यंत भव्य आणि अविस्मरणीय ठरला. नवरात्रीच्या पवित्र पर्वात भक्तिभाव, उत्साह आणि सांस्कृतिक वैभव यांनी नटलेल्या या महोत्सवाच्या उद्घाटनाने संपूर्ण परिसर दांडियाच्या तालावर गजबजून गेला. नागरिकांच्या उपस्थितीने वातावरण प्रफुल्लित आणि उत्साहवर्धक झाले,या भव्य सोहळ्याचे उद्घाटन मावळ लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार मा. श्रीरंग आप्पा बारणे आणि माझी राज्यमंत्री व पुरंदरचे लोकप्रिय आमदार मा. विजय बापू शिवतारे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उद्घाटनाचा प्रत्येक क्षण जणू नवरात्रीच्या मंगलमय वातावरणाला दिव्य तेज देत होता.

पद्मश्री जयमालाबाई शिलेदार यांची जन्मशताब्दी – सविस्तर बातमी

भारतातील सुप्रसिद्ध ड्रमर गिरीश विश्वा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या उपस्थितीमुळे महोत्सवाची शोभा अनेक पटींनी वाढली, तर त्यांच्या “विश्वा रॉकर्स” टीमने सादर केलेल्या अद्भुत वाद्यवृंदाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले,सांस्कृतिक कार्यक्रमात लोकप्रिय गायक-गायिका पवन सिंह, शुभम सिंह, इशिता विश्वकर्मा आणि ऋतुजा जाधव यांनी मनमोहक आणि रंगतदार गीतांनी उपस्थितांचे मन जिंकले. नागरिकांनी ठेका धरत दांडियाचा आनंद घेतला आणि प्रत्येक क्षण भक्तिभाव व सांस्कृतिक उर्जेने नटला होता.

या आठ दिवस चालणाऱ्या महोत्सवात उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट नृत्य आणि उत्कृष्ट दांडिया ग्रुपसाठी अनुक्रमे 21 हजार, 15 हजार आणि 10 हजार रुपयांची आकर्षक बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. या बक्षिसांची लॉटरी दररोज करण्यात येणार आहे, ज्यामुळे प्रत्येक सहभागीला आपल्या प्रतिभेची सादरीकरणाची संधी नियमित मिळणार आहे,विशेष म्हणजे उद्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे साहेब या भव्य महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, ज्यामुळे महोत्सवाचा उत्साह आणखी शिखरावर पोहोचणार आहे.

फेस्टिवलच्या पहिल्याच दिवशी असंख्य नागरिकांनी प्रतिसाद देत भव्य, दिव्य आणि आनंददायी रास दांडिया अनुभवला ज्यातून येणाऱ्या प्रत्येक दिवशी भक्तिभाव, उत्साह आणि सांस्कृतिक वैभवाचा अनुभव नागरिकांना मिळणार आहे. पुणेकरांना या आठवडाभर चालणाऱ्या महोत्सवात सहभागी होण्याची संधी नक्कीच उत्साहवर्धक ठरेल, आणि दांडियाच्या तालावर नृत्य करताना साजरा होणारा उत्साह प्रत्येकाच्या स्मृतीत आनंदाचे अविस्मरणीय क्षण नोंदवून जाईल,यावेळी जिल्हाप्रमुख उल्हास भाऊ तुपे, जिल्हा परिषद सदस्य, महिला आघाडी जिल्हाप्रमुख स्वातीताई टकले, मच्छिंद्र दगडे, राकेश झांबरे, बाळासाहेब वाल्हेकर, युवा सेना महानगरप्रमुख राजेश पळसकर, शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना आणि सर्व अंगीकृत संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×