पुण्यात रंगणार “स्व. गंगुबाई संभाजी शिंदे नवरात्री फेस्टिवल २०२५

पुण्यात रंगणार “स्व. गंगुबाई संभाजी शिंदे नवरात्री फेस्टिवल २०२५

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांची विशेष उपस्थिती लाभणार

marathinews24.com

पुणे – सुप्रसिद्ध ड्रमर गिरीश विश्वा यांच्या नेतृत्वाखालील “विश्वा रॉकर्स” टीमसह अनेक लोकप्रिय कलाकारांच्या उपस्थितीत यंदा पुणेकरांना नवरात्री महोत्सवाचा अविस्मरणीय अनुभव घेता येणार आहे. इंडियन आयडॉल आणि सारेगामापा फेम इशिता विश्वकर्मा, मौसम विश्वा, हेत्वी सेठिया विश्वा, पवन कुमार, शिवम सिंह, विश्वजा जाधव आणि योगेशजी इंदोरिया यांसारखे नामांकित कलाकारांच्या उपस्थितीत शिवसेना पुणे शहर आणि एकनाथ शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “स्व. गंगुबाई संभाजी शिंदे नवरात्री फेस्टिवल २०२५” चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा २४ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत दररोज सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत रहेजा चौक, एनआयबीएम रस्ता, महादेववाडी, हडपसर, पुणे येथे भव्य रास–दांडिया, गरब्याच्या जल्लोषात पार पडणार आहे.

ध्यान केल्याने विचारांमागे लपलेली मनाची शांती प्रकट होते – सरश्री – सविस्तर बातमी 

पुणेकरांसाठी हा सोहळा मोफत प्रवेशासह खुला ठेवण्यात आला असून, नवरात्रीच्या मंगलमय वातावरणात कुटुंबीयांसोबत आनंद लुटण्याची सुवर्णसंधी ठरणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन पुरंदरचे आमदार, माजी मंत्री विजय बापू शिवतारे यांच्या शुभहस्ते होणार असून, महाराष्ट्राचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे, रोहयो, फलोत्पादन तथा खारविकास मंत्री भरत शेठ गोगावले, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार चेतन तुपे पाटील, आमदार योगेश आण्णा टिळेकर आणि रवींद्र धंगेकर यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे, नऊ दिवस चालणारा हा भव्य सोहळा पुणेकरांसाठी अविस्मरणीय ठरणार आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २७ सप्टेंबरला विशेष अतिथी म्हणून या महोत्सवाला भेट देणार आहेत. विशेष उपस्थिती म्हणून श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचेदेखील पुण्यात आगमन होणार असून, त्यांच्या पावन उपस्थितीने हा उत्सव भक्तीमय आणि आध्यात्मिकतेने उजळून निघणार आहे, परंपरेशी नाळ जपत पुणेकरांना एकत्र आणणारा हा सोहळा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही स्तरांवर एक वेगळी छाप सोडणार आहे. नवरात्रीच्या आनंद, भक्ती आणि उत्साहाच्या या पावन काळात पुणेकरांना कुटुंबियांसोबत आणि मित्रपरिवारासह एकत्र येऊन संगीताच्या तालावर थिरकण्याची, भव्य रास–दांडिया, गरब्याच्या रंगात सहभागी होण्याची आणि आपल्या परंपरेचे वैभव अनुभवण्याची एक आगळीवेगळी संधी आहे.

महोत्सवात विविध क्षेत्रात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मानदेखील करण्यात येणार आहे. रंगीबेरंगी रोषणाई, विशेष आसन व्यवस्था, सुरेल संगीत, आकर्षक मंच आणि भव्य आयोजनामुळे हा उत्सव पुण्यातील दिमाखदार सांस्कृतिक सोहळ्यातील विशेष अनुभव देणारा ठरणार आहे. शिवसेना पुणे शहरप्रमुख व एकनाथ शिंदे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद (नाना) भानगिरे यांच्या वतीने सर्व पुणेकरांना या भव्य उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे विशेष आवाहन करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×