आध्यात्मिक गुरू सरश्री यांनी “आंतरिक जागतिक शांती” या विषयावर एक विशेष ध्यान सत्र आयोजित
marathinews24.com
पुणे – जागतिक शांती दिनानिमित्त, तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक आणि आध्यात्मिक गुरू सरश्री यांनी “आंतरिक जागतिक शांती” या विषयावर एक विशेष ध्यान सत्र आयोजित केले. सरश्री यांनी साधकांना अंतर्गत चिंता आणि अस्वस्थता दूर करून भावनिक संतुलन कसे मिळवायचे हे समजावून सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की बाल पणापासून मनात रुजलेल्या श्रद्धांचा खेळ एखाद्या व्यक्तीमध्ये चालू राहतो. तुमचे जीवन तुमच्या श्रद्धांवरून घडते. एखादी व्यक्ती आपले संपूर्ण आयुष्य “मी शरीर आहे” या खोट्या श्रद्धेत घालवते, ज्यामुळे तो शरीराच्या सुख-दु:खात, मनाच्या खेळात आणि बुद्धीच्या भ्रमात अडकतो. जेव्हा स्वतःची इतरांशी सतत तुलना करणारे मन ज्ञान मिळवते, तेव्हा अतिविचार कमी होतो आणि मनाची शांती स्थापित होते.
ढोले पाटील ज्युनियर कॉलेजच्या आर्यन कराड यास तलवारबाजीत यश – सविस्तर बातमी
सरश्री म्हणाले, सोडून देणे, क्षमा मागणे आणि स्वीकारणे, कृतज्ञता व्यक्त करणे आणि चेहऱ्यावर स्मित हास्य यासारख्या सजगतेचा सराव करून तुम्ही आंतरिक शांती मिळवू शकता. सरश्री म्हणाले की, दिवसातून काही मिनिटे ध्यान केल्याने विचारांमागे लपलेली मनःशांती प्रकट होते. त्यांनी उपस्थितांना ध्यानातही नेले. या प्रसंगी सरश्री यांनी लिहिलेल्या “आज के युग की दास्तान-ए-ययाति” आणि “सहस की बेटी – संतुलित जीवन सुंदर जीवन” या दोन हिंदी पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले.
तेजज्ञान फाउंडेशनच्या कार्यकारी विश्वस्त तेजविद्या यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सिंहगड रोडवरील मनन आश्रमात हा कार्यक्रम झाला यावेळी हजारो साधक ऑफलाइन आणि ऑनलाइन माध्यमातून कार्यक्रमात सहभागी झाले होते.





















