Breking News
बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन पूर्ववत करापोलिसांच्या हाती लागू नको, सतत ठिकाणे बदलत राहाराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्तपुण्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात कुटूंबातील तिघे ठार‘पीएलएफएस आणि ‘एएसयुएसई’विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेला तळेगाव दाभाडे येथे सुरुवातवारजेतील लॉजवर गुन्हे शाखेचा छापमौजमजेसाठी सायकल चोरी; अल्पवयीन ताब्यातयेरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणीसायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची ६२ लाखांची फसवणूक

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची द्वितीय यादृच्छिकीकरण प्रक्रिया पूर्ण

बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची द्वितीय यादृच्छिकीकरण प्रक्रिया पूर्ण

उमेदवार व पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत पारदर्शक प्रक्रिया; मतदान केंद्रनिहाय ईव्हीएम-व्हीव्हीपॅटचे वाटप पूर्ण

marathinews24.com

बारामती – बारामती विधानसभा मतदारसंघाच्या आगामी पोटनिवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यांचे द्वितीय यादृच्छिकीकरण ( रेंडमायझेशन) दिनांक १६ एप्रिल रोजी बारामती येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात पार पडले. या प्रक्रियेद्वारे मतदान केंद्रनिहाय ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री रोजगार योजनेतून स्वावलंबन; इतरांनाही दिली रोजगाराची संधी – सविस्तर बातमी 

भारतीय निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम व्यवस्थापन प्रणाली (EMS) च्या माध्यमातून मतदान केंद्रनिहाय ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यांचे यादृच्छिक वाटप करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत द्वितीय यादृच्छिकीकरण करण्यात येते. ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या द्वितीय यादृच्छिकीकरणाबाबत सविस्तर सूचना ‘इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र मार्गदर्शिका’मध्ये उपलब्ध असून ती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर (https://www.eci.gov.in/evm-vvpat) पाहता येईल.

ईव्हीएम व्यवस्थापन प्रणालीच्या माध्यमातून २०१ बारामती विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी भारत निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या साठवण व सुरक्षा नियमांनुसार, निवडणूक लढवणारे उमेदवार तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत द्वितीय यादृच्छिकीकरण प्रक्रिया पूर्ण केली.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच अपक्ष उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी म्हणून योगेश मोहनदास, डॉ. विजयकुमार रामचंद्र भिसे, सुखदेव धोंडीबा हिवरकर, सुजित महादेव जाधव, रवी शहाजी धुमाळ, संग्रामसिंह नानासाहेब मोकाशी तसेच निवडणूक निरीक्षक श्री. विद्यानंद सिंग उपस्थित होते. द्वितीय यादृच्छिकीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्रनिहाय वाटप करण्यात आलेल्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची यादी तसेच राखीव ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची माहिती सर्व उमेदवारांना देण्यात आली आहे.

ही यंत्रे मतदानाच्या दिवशी संबंधित मतदान केंद्रांवर वापरण्यात येणार आहेत. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×