Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मस्साजोग पोटनिवडणुकीत देशमुखांच्या पत्नीचा ९२ मतांनी पराभव

मस्साजोग सरपंचपदी स्वरूपानंद देशमुख यांची वर्णी

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे रिक्त झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना पराभव पत्करावा लागला. प्रतिस्पर्धी स्वरुपानंद देशमुख यांनी अश्विनी देशमुख यांचा ९२ मतांनी पराभव केला. निवडणूक ही बिनविरोध करण्यासाठी आधी प्रयत्न झाले मात्र स्वरुपानंद देशमुख हे निवडणूक रिंगणात उतरल्याने येथील निवडणूक राज्यभरात चर्चेत राहिली.

सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावी – सविस्तर बातमी

निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांचा मागील निवडणूक कीत केवळ ९ मतांनी पराभव झाला होता. आता ९२ मतांनी त्यांचा विजय झाला आहे. विजयानंतर गुलाल उधळत स्वरूपानंद देशमुखांच्या समर्थकांनी विजयाचा आनंदोत्सव साजरा केला.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने केज तालुक्यातील हे गाव प्रकाश झोतात आले आहे. देशमुखांची हत्या झाल्यानंतर तेथील सरपंच पद हे रिक्त झाले होते. या पदासाठी पोटनिवडणूक लागली. दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना बिनविरोध सरपंच करण्याबाबत प्रचंड हालचाली झाल्या. मात्र गेल्या निवडणुकीत अवघ्या ९ मतांनी पराभव स्विकारलेले स्वरुपानंद देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणूक लढविण्याचे निश्चित केले. यादरम्यान अश्विनी देशमुख यांना सहानुभूतीचा फायदा होईल, असे एकीकडे वाटत असताना गेल्या १५ दिवसांच्या कालखंडात दोन्ही गटांकडून जोरदार प्रचार करण्यात आला.

स्वरूपानंद देशमुख आणि अश्विनी देशमुख हे दोघेही गावात दारोदार फिरून मतदाराशी संवाद साधत होते. दि. २८ मंगळवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली, मोठ्या पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पार पडली तेव्हा १७४४ म्हणजे ८४ टक्के मतदान झाले. काल मतमोजणीला प्रात्यक्षात सुरुवात झाली तेच्या स्व्यानंद देशमुख बांना ९१४ अश्विनी देशमुख नांना ८२२ तर नोटाला ८ मतदान पडले. त्यानुसार स्वरुपानंद देशमुख हे ९२ मतांनी विजयी झाले. निकालानंतर मस्साजोगचे नवनिर्वाचित सरपंच स्वरुपानंद देशमुख यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधला आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो, माझे मतदार माझ्यासोबत आहेत, त्यानी मतदानरूपी आशीर्वाद देऊन हे सिद्ध केलं आहे. कोणी माझ्यावर काहीही आरोप केले तरी माझी जनता माझ्या सोबत आहे. मी अगोदरही संतोष देशमुखांच्या साठीच्या न्यायासाठी लढत पुढे होतो, येथून पुढेही या लढाईत पुढे असेल. हा विजय माझ्या तरूण मतदारांचा आणि कार्यत्यांचा आहे. त्यांनी माझ्यासाठी रात्रीचा दिवस केला. हा माझ्या गावातील जनतेचा आणि स्वाभिमानी मतदारांना विजय असल्याने गावाचा कायापालट करेल असे सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×