Breking News
Pune Woman Police Assault : पुण्यात विसर्जन घाटावर महिला पोलिसाला नारळ फेकून मारला, दातच पाडलाShivraj More Voter List : मतदार याद्यांतील गोंधळाची चौकशी करा; ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्याChakan Hinjewadi Infrastructure Plan : चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्यास तत्वतः मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसNeelam Gorhe Residence Case : डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्नDog Attack : कुत्र्याने घेतला १२ वर्षीय मुलाच्या चेहर्‍याचा चावाSugarcane Crushing Season 2026 : ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; परवाना प्राप्त कारखान्यांना त्यापूर्वीही गाळपाची मुभाSeva Sankalp Abhiyan Indapur : इंदापूर तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहातPimpri Chinchwad Election Restrictions : विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये निर्बंध लागूपद्मश्री डॉ. कोल्हे दाम्पत्याकडून दुधभाते नेत्रालयाच्या आधुनिक नेत्रसेवेचे कौतुकPune Crime News : काळेपडळमध्ये गांजा विक्रेत्या सराईत टोळीचा पर्दाफाश

जिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी 

जिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी 

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

marathinews24.com

पुणे – ग्रामविकासामध्ये जिल्हा परिषद सदस्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून विकासात्मक दृष्टी ठेवून काम केले तर ग्रामविकासाला मोठी चालना मिळेल. त्यासाठी हे प्रशिक्षण मैलाचा दगड ठरेल असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

मस्साजोग पोटनिवडणुकीत देशमुखांच्या पत्नीचा ९२ मतांनी पराभव – सविस्तर बातमी 

राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान व राज्य ग्रामीण विकास संस्था (यशदा) यांच्या संयुक्त विद्यमाने यशदा, पुणे येथे नुकतीच राज्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांसाठी तीन दिवसीय पायाभूत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.

या कार्यशाळेच्या पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव, लातूर व पुणे जिल्ह्यातील एकूण ८५ जिल्हा परिषद सदस्य सहभागी झाले होते.

गोरे म्हणाले की, जिल्हा परिषदेमध्ये प्रभावीपणे काम करण्यासाठी सदस्यांना प्रशिक्षण अत्यंत आवश्यक आहे. ग्रामविकास विभागाच्या वतीने यशदा येथे नव्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्यांना विविध विषयांवरील सखोल मार्गदर्शन देण्यात आले. या प्रशिक्षणाचा उपयोग करून सदस्यांनी आपल्या मतदारसंघात सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घ्यावा.

राज्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत सक्षमीकरण अभियानाला मोठा प्रतिसाद मिळत असून प्रत्येक गाव समृद्ध करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्यांनी सक्रिय भूमिका बजावावी, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी जिल्हा परिषद पुणे चे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, यशदाचे महासंचालक डॉ. सुहास दिवसे, अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपमहासंचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी तसेच सत्र संचालक आनंद पुसावळे व शरदचंद्र माळी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×