Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

२२ वर्षे सीआरपीएफमध्ये देशसेवा बजावलेल्या सागर भरगुडे यांचा नेरे ग्रामस्थांकडून भव्य सत्कार

३१ जुलै रोजी सन्मानपूर्वक सेवानिवृत्तीनंतर गावातून भव्य मिरवणूक; मान्यवरांच्या उपस्थितीत देशसेवेचा गौरव

marathinews24.com

पुणे – नेरे गावचे सुपुत्र सागर नारायण भरगुडे यांनी केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) मध्ये तब्बल २२ वर्षे देशसेवा बजावून ३१ जुलै २०२६ रोजी सन्मानपूर्वक सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यांच्या गौरवशाली सेवेला सलाम करत २ ऑगस्ट २०२६ रोजी भरगुडे कुटुंबीय आणि नेरे गावातील ग्रामस्थांच्या वतीने त्यांची गावातून भव्य मिरवणूक काढून जंगी स्वागतही करण्यात आले. त्यानंतर आयोजित सन्मान सोहळ्यात त्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

पद्मा फाउंडेशनचे संस्थापक शशिकांत कांबळे यांचा डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते शिवसेना पक्षात प्रवेश – सविस्तर बातमी

सागर भरगुडे यांनी ३ मार्च २००४ रोजी सीआरपीएफमध्ये प्रवेश केला. आसाम येथे त्यांचे प्रारंभिक प्रशिक्षण पूर्ण झाले. त्यानंतर पुढे त्यांनी जम्मू-काश्मीर, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील भागांमध्ये अत्यंत धाडसाने व निष्ठेने कर्तव्य बजावत देशसेवा केली. त्यांच्या शिस्तबद्ध, प्रामाणिक आणि समर्पित सेवेमुळे त्यांनी आपल्या गावासह संपूर्ण परिसराचे नाव उज्ज्वल केले. सोबतच गावातील आजी-माजी सैनिकांचा देखील भरगुडे परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.

या सत्कार समारंभाला भोर, वेल्हा, मुळशी मतदारसंघाचे माजी आमदार संग्रामदादा थोपटे. सामाजिक कार्यकर्ते अनिलनाना सावले. नेरे गावचे सरपंच विजय बढे, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच नेरे गावातील महिला पुरूष मोठ्या संख्येत उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी भरगुडे यांच्या देशसेवेचा गौरव करत त्यांच्या कार्याचा युवा पिढीने आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. संपूर्ण गाव देशभक्तीच्या वातावरणात न्हाऊन निघाला असून सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेरे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष अंनदा बढे यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×