Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात सराईत गुंडाचा मित्रांकडून खून

पुण्यात प्रेम प्रकरणातून अल्पवयीनाचा खून

फुरसुंगीतील घटना

marathinews24.com

पुणे – गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मित्राच्या त्रासामुळे त्याचा चौघांनी तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना हडपसरमधील फुरसुंगी भागात मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी चौघांना अटक केली. आकाश उर्फ राणा मोहन कांबळे (वय २३, रा. गंगानगर, फुरसुंगी) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे. या प्रकरणी आदित्य नामेश्वर पिंपळे (वय २०), ओंकार प्रमोद मोरे (वय २३), अरुण अनिल यादव (वय २४), दत्ता व्यंकट गिते (वय २०, चैाघे रा. शेवाळवाडी, हडपसर, पुणे-सोलापूर रस्ता) यांना अटक करण्यात आली.

पुणे पोलीस नियंत्रण कक्षातील गैरहजरी भोवली – सविस्तर बातमी

आरोपींबरोबर असलेल्या एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींचा साथीदार पसार झाला असून, त्याचा शोध घेण्यात येत आहे. आकश याची आई रेखा कांबळे (वय ४२) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि आकाश हे मित्र आहेत. चार दिवसांपूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. आकाश मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास फुरसुंगीतील गंगानगर परिसरातून निघाला होता. त्या वेळी आरोपींनी त्याला गाठले. त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, विवेक मासाळ, सहायक आयुक्त अनुराधा उदमले, पोलीस निरीक्षक राजेश खांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चौघा आरोपींना अटक करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×