Breking News
पुण्यात पीएमपी बसच्या धडकेत दोन महिलांचा मृत्यूज्येष्ठ नागरिकाची ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूककेंद्रीय अर्थमंत्र्यांच्या ‘डीपफेक व्हिडीओद्वारे फसवणुकगाेळीबार करुन २२ तोळ्यांच्या दागिन्यांची लुटनदीपात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत सापडलेपरदेशात नोकरीच्या आमिषाने नागपूरमधील महिलेची पोर्तुगालमध्ये विक्रीब्लॅक स्पॉटचे निरीक्षण करून १० ऑक्टोबरपूर्वी आवश्यक उपाययोजनांद्वारे निर्मूलन कराकर्जमुक्ती योजनेच्या लाभ वितरणास प्रारंभ; प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसअन्यायाविरोधात डॉक्टरांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मदतीचा हात

पुणे पोलीस नियंत्रण कक्षातील गैरहजरी भोवली

टोळक्याकडून पोलीस शिपायाला धक्काबुक्की

सहायक निरीक्षकाला निलंबित करण्याचा पोलीस आयुक्तांचा आदेश

marathinews24.com

पुणे – पोलिसांच्या नियंत्रण कक्षात नेमून दिलेल्या कामाच्या वेळेत गैरहजर राहणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला. अभिजित प्रभाकर जाधव असे निलंबित करण्यात आलेल्या सहायक निरीक्षकाचे नाव आहे. सहायक निरीक्षक जाधव यांची ३१ मार्च २०२६ रोजी पोलीस नियंत्रण कक्षात दुपारी चार ते रात्री बारा या वेळेत ‘सीआरओ’ (कंट्रोल रूम ऑफिसर) म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

तब्बल ६० लाखांचा गुटखा जप्त – सविस्तर बातमी

पोलीस नियंत्रण कक्षातील वरिष्ठांना कोणतीही पूर्वसूचना न देता जाधव गैरहजर राहिले. त्यामुळे पोलीस नियंत्रण कक्षाकडून शहरातील महत्त्वाच्या घटनांचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना सादर करण्यास उशीर झाला. पोलीस नियंत्रण कक्षातील अधिकारी ही महत्त्वाची जबाबदारी आहे. संपूर्ण शहरातील घडामोडींवर पोलीस नियंत्रण कक्षातील अधिकारी लक्ष ठेवून असतात. यापूर्वीही पूर्वसूचना न देता सहायक निरीक्षक जाधव हे गैरहजर राहिले होते. त्यांना वेळोवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समजही दिली होती. मात्र, त्यांच्या वर्तणुकीत बदल झाला नव्हता. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाधव यांची चौकशी केली. त्यांचे वर्तन हे बेजबाबदार आणि निष्काळजीपणाचे असल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर सहायक निरीक्षक जाधव यांना निलंबित करण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×