Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

तब्बल ६० लाखांचा गुटखा जप्त

तब्बल ६० लाखांचा गुटखा जप्त

खेड-शिवापूर टोलनाका परिसरात ट्रक पकडला

marathinews24.com

पुणे – राज्यात प्रतिबंधित असलेल्या विमल गुटख्याच्या तस्करीचा पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक एकने भांडाफोड केला आहे. याप्रकरणी तब्बल ६० लाखांचा विमल गुटखा, ट्रक, मोबाइल असा ८० लाख ३२ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. श्रीशैल तम्माराय हाळके (वय ३२ रा. मु.पो उमदी, ता. जत, जि. सांगली) याला अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक एकमधील पोलीस अंमलदार अमोल सरडे यांना सराईत आरोपींचा प्रतिबंधीत गुटख्याचा ट्रक (एम.एच.११ डी. डी ६५२७) कात्रज घाटमार्गे पुण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.

बिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूक – सविस्तर बातमी 

अमली पदर्थ विरोधी पथकाने २८ एप्रिलला रात्री साडेबाराच्या सुमारास पथकाने कात्रज घाट परिसरात सापळा रचला. मात्र, बराच वेळ ट्रक न आल्यामुळे माहिती घेतली असता, ट्रक खेड शिवापूर टोल नाका परिसरात थांबल्याचे स्पष्ट झाले. पथकाने राजगड पोलिसांच्या मदतीने ट्रक चालक श्रीशैल तम्माराय हाळके याला ताब्यात घेतले. ट्रकची पाहणी केली असता त्यामध्ये गुटखा मिळून आला. दोघा आरोपींनी हा गुटखा विक्रीसाठी पुण्यात मागवल्याचे उघडकीस आले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त, रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, एसीपी शंकर खटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, एपीआय अनिल सुरवसे, विठ्ठल साळुंखे, संजय राजे, अमोल सरडे, निलेश जाधव, विशाल भिलारे, मंगेश गुंड, अक्षय शिर्वेâ, आशा भिंगारे यांनी केली.

वाघोलीत गुटखा, सिगारेटची विक्री करणार्‍यांविरूद्ध कारवाई

वाघोली परिसरात प्रतिबंधित गुटख्यासह विदेशी सिगारेटची विक्री करणार्‍याविरूद्ध गुन्हे शाखेच्या युनीट सातने कारवाई केली आहे. आरोपींकडून ४ लाख ३२ हजारांचा सिगारेट साठा जप्त केला आहे. जहीर नुरमोहम्मद शेख वय ४० रा. वाघोली, अकील नुरमोहम्मंद शेख वय ३८, यांच्याविरूद्ध कारवाई केली आहे. ही कामगिरी उपायुक्त विवेक मासाळ, एसीपी राजेंद्र मुळिक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, एपीआय मदन कांबळे, विनायक साळवे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, निर्णय लांडे, ऋषीकेश ताकवले, सुहास तांबेकर, भरत गुंडवाड, नितीन धाडगे, प्रतिक्षा पानसरे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×