Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

विवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्या

नैराश्यातून बीडच्या खो-खो पटूची पुण्यात आत्महत्या

आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – लग्न झालेले असतानाही विवाहित महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडवून तिला त्रास दिला. त्यानंतर आरोपीच्या पत्नीसह इतरांनी संबंधित दाम्पत्याला शिवीगाळ करीत मारहाण केली. त्रासाला कंटाळून महिलेने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना २८एप्रिलला बिबवेवाडीतील विघ्नहरनगरातील रणधीर हाउसमध्ये घडली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, इतर आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा – सविस्तर बातमी 

मोनाली गौरव धुर्डे (वय ३४ रा. रणधीर हाउस बिबवेवाडी )असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सचिन मोहन जुन्नरकर (वय ३८) आणि अश्विनी सचिन जुन्नरकर (वय ३३ दोघेही रा. ढमाले कॉम्लेक्स, सुखसाखरनगर, बिबवेवाडी )अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनाली धुर्डे ही कुटूंबियासह बिवेवाडीतील विघ्नहरनगरात राहायला होती. त्यावेळी आरोपी सचिन जुन्नरकर याने तिला प्रे्रमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर काही दिवसांनी तिला त्रास देण्यास सुरूवात केली. दरम्यान, याप्रकरणाची माहिती आरोपीची पत्नी अश्विनीला समजल्यानंतर तिने इतर आरोपींच्या मदतीने मोनालीचे घर गाठले. आरोपींनी मोनालीसह तिचा पती गौरवला शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यानंतर मोनालीच्या डोक्यात कठीण वस्तूने मारहाण करीत जखमी केले. आरोपींनी धुर्डे दाम्पत्याला अपमानित केल्याचा राग मोनालीला सहन झाला नाही. त्यामुळे तिने २८ एप्रिलला राहत्या घरी गळफास घेउन आत्महत्या केली. गौरव धुर्डे यांच्या फिर्यादीनुसार आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भारत वाघ तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×