Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा

पॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा

बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – टेलीकॉम रेग्युलेटरी ऑथरिटी ऑफ इंडियाच्या कार्यालयातून बोलत असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी जेष्ठ नागरिकाला तब्बल ३५ लाखांचा गंडा घातला आहे. मोबाइलद्वारे अनेकांना पॉर्न व्हिडिओ (अश्लील व्हिडिओ) पाठवल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली असून, मनी लॉड्रींग केसमध्ये अटक करण्याची धमकी देउन बँकखाते व्हेरीफाय करण्यासाठी रक्कम पाठवण्यास भाग पाडले. ही घटना २३ मार्च ते १३ एप्रिल २०२६ कालावधीत पाषाणमध्ये घडली आहे. याप्रकरणी जेष्ठाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पुण्यात रिकव्हरी एजंटांची मुजोरी, तरूणाला बेदम मारहाण – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक पाषाणमध्ये राहायला असून, २३ मार्चला सायबर चोरट्यांनी त्यांना फोन केला. टेलीकॉम रेग्युलेटरी ऑथरिटी ऑफ इंडियाच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगितले. तुमच्या मोबाइल क्रमांकावरून अनेकांना पॉर्न व्हिडिओ पाठवण्यात आले आहेत, त्याबाबतची तक्रार आमच्याकडे आल्याची माहिती संबंधितांनी दिली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी जेष्ठाला मनी लॉड्रींगमध्ये अडकवण्याची भीती दाखवून बँकखाते तपासणीसाठी पैसे पाठवण्यास भाग पाडले. तब्बल ३५ लाख रूपये पाठवल्यानंतर तक्रारदाराला संशय आला. त्यानंतर त्यांनी माहिती घेतली असता, फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अलका सरग तपास करीत आहेत.

शेअरमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली ३० लाखांची फसवणूक

शेअर मार्वेâटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी वाघोलीतील ५५ वर्षीय नागरिकाला ३० लाख २९ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १५ जानेवारी ते २ एप्रिल २०२६ कालावधीत वाघोलीत घडली आहे. याप्रकरणी संबंधिताने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×