Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

पुण्यात रिकव्हरी एजंटांची मुजोरी, तरूणाला बेदम मारहाण

 पुण्यात रिकव्हरी एजंटांची मुजोरी, तरूणाला बेदम मारहाण

तिघांविरूद्ध गुन्हा दाखल, हडपसरमधील घटना

marathinews24.com

पुणे – थकित क्रेडीट कार्ड कर्जाचे हप्ते भरण्यास उशीर झाल्यामुळे इंडसन्ड बँकेच्या रिकव्हरी एजंटांनी मस्तवालपणा करीत तरूणाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी सुरूवातील एनसी दाखल केलेल्या हडपसर पोलिसांना मात्र उशिरा जाग आली. त्यानंतर आता याप्रकरणी खंडणीसह घातक शस्त्राने मारहाण, गुन्हेगारी प्रवृत्तीचे वृत्त अशा विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. जय सुहास कासार , विनित सुहास कासार, तनिष्क हरीष खुडे (तिघे रा. मांजरी, पुणे )यांच्याविरूद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप हनुमंत जामदार (वय ३५, रा. फुरसुंगी )यांनी तक्रार दाखल केली आहे.

मेंहदीच्या कार्यक्रमात टोळक्याने एकाला लुटले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार संदीप जामदार यांनी २०२४ मध्ये मित्राला दुचाकी घेण्यासाठी इंडसन्ड बँकेचे क्रेडीट कार्ड स्वाईप करीत ३५ हजार रूपयांचे बील अदा केले होते. मात्र, काही महिन्यांनी मित्राने संबंधित पैसे भरण्यास नकार दिल्यानंतर ही रक्कम व्याजासह ९५ हजारांवर गेली होती. त्यानंतर बँकेचा रिकव्हरी एजंट जय हा संदीपच्या घरी गेला. त्याने आरडाओरड करून पैशांचा तगादा लावला होता. याबाबतीत संबंधित बँकेने कोणतीही नोटीस संदीपला पाठवली नव्हती. तरीही रिकव्हरी एजंट त्यांना त्रास देत होते. २७ मार्चला आरोपी रिकव्हरी एजंटांनी संदीपला १५ नंबर हडपसर चौकात बोलावून घेतले. त्याठिकाणी त्यांनी वाढीव रकमेची मागणी केली. संदीपने नकार दिल्यानंतर आरोपींनी त्याला काठीने मारले. शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच गुप्तांगाला मारहाण करीत जीव जाईल अशी मारहाण केली आहे.

व्हिडिओ व्हायरल, नागरिकांमधून संताप

तरूणाला रिकव्हरी एजंटांकडून बेदम मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी तरूणाला वाचवण्यासाठी एका महिलेने पुढाकार घेतला होता. मात्र, तरीही इंडसन्ड बँकेच्या रिकव्हरी एजंटांनी मुजोरी करीत बेदम मारहाण केली. दरम्यान, घटनेचा नागरिकांनी निषेध व्यक्त करीत सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. कमेंट्द्वारे घटनेबाबत नाराजी व्यक्त करीत बँकेविरूद्धही कारवाईची मागणी केली आहे.

बेशिस्त एजंटांविरूद्ध कारवाई होणार-पोलीस आयुक्त अमितेश कुमार

कर्ज घेतलेल्या नागरिकांना दमबाजी करून वसुली करणार्‍या एजंटांचा मस्तवालपणा खपवून घेतला जाणार नाही. याप्रकरणी आम्ही कठोर भूमिका घेतली असून, चारित्र्य पडताळणीविना असलेल्या सर्व बँकांच्या रिकव्हरी एजंटांविरूद्ध कारवाई केली जाणार आहे. रात्री-अपरात्री घरी जाउन वसुलीची विचारणा करणे, रस्त्यात असलेली वाहने मालकाकडून काढून घेणे, दमदाटी करून वसुलीची विचारणा करणे कायद्याच्या विरोधात आहे. दरम्यान, पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अशा दादागिरीला माफी नाही, संबंधित बँकासह रिकव्हरी एजंटांविरूद्ध कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×