Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मेंहदीच्या कार्यक्रमात टोळक्याने एकाला लुटले

मुंढवा चौकात दुचाकीस्वार चोरट्यांचा राडा, तरुणाला लुटले

५ जण अटकेत

marathinews24.com

पुणे – विवाह समारंभातील मेंहदीच्या कार्यक्रमात टोळक्याने एकाला शस्त्राचा धाक दाखवून पाच लाखांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना येरवडा भागात घडली. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध दरोड्याचा गु्न्हा दाखल करुन त्यांना अटक केली. संतोष काची, यश काची (रा. ममतानगर, सांगवी, पिंपरी-चिंचवड), दत्ता रघुनाथ चव्हाण (रा. वारजे), सुशील सूर्यकांत गौड (रा. पाटील इस्टेट, जुना मुंबई-पुणे रस्ता), यश दीपक सावंत (रा. जुनी सांगवी, पिंपरी-चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत नंदू अर्जुन काची (वय ५३, रा. संजयनगर, फुगेवाडी, पिंपरी-चिंचवड) यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

काय सांगता…बंगल्यात केली गांजाची लागवड – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवड्यातील संगमवाडी परिसरात सुनीता काची यांच्या घरी २७ एप्रिल रोजी रात्री दहाच्या सुमारास मेंहदीचा कार्यक्रम सुरू होता. आरोपी आणि फिर्यादी हे ओळखीचे आहेत. आरोपींनी त्यांना कार्यक्रमात शिवीगाळ करुन शस्त्राचा धाक दाखविला. त्यांच्या गळ्यातील पाच लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. त्यांना मारहाण करुन आरोपी पसार झाले. घाबरलेल्या काची यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करुन पसार आरोपींना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक मिथून सावंत तपास करत आहेत.

दुकानातून १ लाख ४० हजारांची रोकड चोरी

शहरातील दुकानांचे कुलूप तोडून गल्ल्यातील रोकड चोरी करण्याच्या घटना वाढल्या आहेत. हडपसर परिसरातील एका दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी गल्ल्यातील एक लाख ४० हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.

याबाबत संदीप रामदास नाळे (रा. कामठे वस्ती, फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यंनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाळे यांचे हडपसरमधील गोंधळेनगर परिसरात गोल्डन बॅटरी हे दुकान आहे. मंगळवारी (२८ एप्रिल) मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडले. गल्ल्यातील एक लाख ४० हजारांची रोकड चोरून चोरटे पसार झाले. मंगळवारी सकाळी दुकानाचे कुलूप तुटल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चाेरट्यांच्या शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक कोलेवाड तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×