Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

खाण्याच्या पानात भांगमिश्रीत नशेच्या गोळ्यांचा वापर

पुण्यात नशेचा गोळ्या विकणारा अटकेत

marathinews24.com

पुणे – भांगमिश्रीत गोळ्यांची विक्री प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी एकाला अटक केली. पानात या गोळ्यांचा वापर करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्याकडून भांगमिश्रीत नशेच्या गोळ्यांची पाकिटे, टेम्पो असा तीन लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विष्णू गुप्ता (वय ४१, रा. मारुंजी, हिंजवडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गुप्ता याच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

ड्रग मुक्त पुणे जनजागृती अभियानाचा शुभारंभ – सविस्तर बातमी

शिवाजीनगर परिसरात पोलीस नाईक सचिन जाधव हे गस्त घालत होते. त्या वेळी गुप्ता हा भांगमिश्रीत गोळ्यांची (बंटा) विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती जाधव यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावला. गुप्ता याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून भांगमिश्रीत गोळ्यांची पाकिटे, तसेच टेम्पो जप्त करण्यात आला. गुप्ता याची चौकशी करण्यात आली. चौकशीत भांगमिश्रीत गोळ्यांचा वापर नशेसाठी करण्यात येत असल्याची माहिती त्याने दिली. या गोळ्या पानात टाकून नशा करण्यात येत असल्याची माहिती त्याने दिली. पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, सहायक निरीक्षक संतोष पाटील, पोलीस कर्मचारी दीपक चव्हाण, सचिन जाधव, महावीर वलटे, राजकिरण पवार, इसाक पठाण, श्रीकांत मखरे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×