Breking News
Pune Woman Police Assault : पुण्यात विसर्जन घाटावर महिला पोलिसाला नारळ फेकून मारला, दातच पाडलाShivraj More Voter List : मतदार याद्यांतील गोंधळाची चौकशी करा; ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्याChakan Hinjewadi Infrastructure Plan : चाकण-हिंजवडीतील वाहतूक व नागरी सुविधांसाठी एकात्मिक पायाभूत विकास आराखड्यास तत्वतः मंजुरी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसNeelam Gorhe Residence Case : डॉ. नीलम गोर्‍हे यांच्या निवासस्थानात शिरण्याचा प्रयत्नDog Attack : कुत्र्याने घेतला १२ वर्षीय मुलाच्या चेहर्‍याचा चावाSugarcane Crushing Season 2026 : ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून; परवाना प्राप्त कारखान्यांना त्यापूर्वीही गाळपाची मुभाSeva Sankalp Abhiyan Indapur : इंदापूर तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ उत्साहातPimpri Chinchwad Election Restrictions : विधानपरिषद शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमध्ये निर्बंध लागूपद्मश्री डॉ. कोल्हे दाम्पत्याकडून दुधभाते नेत्रालयाच्या आधुनिक नेत्रसेवेचे कौतुकPune Crime News : काळेपडळमध्ये गांजा विक्रेत्या सराईत टोळीचा पर्दाफाश

पुण्यात गंगाधाम रस्त्यावर रासायनिक कंपनीतून गॅस गळती

२४ नागरिकांना श्वसनाचा त्रास

marathinews24.com

पुणे – शहरातील मार्केट यार्डातील गंगाधाम – बिबवेवाडी रस्त्यावर असलेल्या एका रासायनिक कंपनीतून मध्यरात्री गॅस गळती झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन गॅस गळती रोखल्याने अनर्थ टळला. रासायनिक कंपनीतून गॅस गळती झाल्यानंतर परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास झाला. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेत अग्निशमन दलाचे एक अधिकारी आणि जवानाला त्रास झाला. त्यांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

पर्वती गावात दोघांवर शस्त्राने वार – सविस्तर बातमी

गंगाधाम रस्त्यावर आईमाता मंदिरासमोर एक रासायनिक कंपनी आहे. या कंपनीतून मध्यरात्री मोठ्या प्रमाणावर गॅस गळती सुरू झाली. गॅस गळती झाल्यानंतर परिसरातील २४ नागरिकांना त्रास जाणवू लागला. डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास जाणवल्याच्या तक्रारी करण्यात आला. गॅस गळतीची घटना समजल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. सुरक्षाविषयक उपकरणे परिधान (बीए सेट) करुन आधिकारी आणि जवान कंपनीत शिरले. त्यांनी तातडीने गॅस गळती रोखली. नागरिकांना त्रास जाणवू लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवानांनी तातडीने नागरिकांना ससून रुग्णालयात दाखल रुग्णवाहिकेतून दाखल केले.

‘गॅस गळतीमुळे २४ नागरिकांना त्रास झाला. अग्निशमन दलाचे एक अधिकारी आणि जवान यांनाही त्रास झाला. त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही’, अशी माहिती अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी दिली. अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच अधिकारी आणि ३० जवान मदतकार्यात सहभागी झाले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×