Breking News
Pune Crime Branch News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआडAmit Shah Pune Visit Traffic Changes : गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर; वाहतूकीत बदलKothrud Newborn Babies Celebration : कोथरुडमधील १ हजारहून अधिक नवजात बालकांचा अनोखा बालदिन सोहळBharat Sasane Pune : मुलांच्या कल्पनाशक्तीला पंख निर्माण करणे महत्त्वाचे-भारत सासणेVishranti Hospital Pune : विश्रांती हॉस्पिटल हे कर्करोग रुग्णांसाठी आशेचा किरण – अ‍ॅडमिरल मनीष होनवाडPune Crime News : पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने लांबविलेKondhwa Flat Theft Pune : कोंढव्यात ८ फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्नPune Khadak Police Theft Case : २५ दिवसांत १० हजार किलोमीटरचा प्रवास करून उघडकीस आणला गुन्हाRaghoji Bhangare Freedom Fighter : सह्याद्रीच्या कपारीत गर्जना करणारा आदिवासींचा वाघ: राघोजी भांगरेSugarcane Trash Management : ढेकळवाडी येथे ऊस पाचट व्यवस्थापन कार्यक्रम संपन्न

Life Certificate Scam : ‘लाईफ सर्टिफिकेट’च्या नावाखाली माजी हवाई दल अधिकाऱ्याला गंडा

Digital Arrest Scam Pune

व्हॉट्सॲपवर बनावट फाइल पाठवून बँक खात्यातून रक्कम लंपास

marathinews24.com

पुणे – Life Certificate Scam : बँक ऑफ इंडिया लाइफ सर्टिफिकेटची बनावट फाइल व्हॉट्सॲपवर पाठवून आणि त्यावर विश्वास संपादन करून सायबर चोरट्यांनी हवाई दलाच्या निवृत्त अधिकाऱ्याची ४ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश सदानंद कलावर (वय ४८, रा. कोंढवा खुर्द) असे फसवणूक झालेल्या निवृत्त हवाई दल अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

बनावट पास बनवून बसमधून केला प्रवास; तरुणावर गुन्हा दाखल – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून त्यांना व्हॉट्स ॲपवर ‘बँक ऑफ इंडिया लाइफ सर्टिफिकेट’ची बनावट फाइल पाठवली. फाइलच्या माध्यमातून फिर्यादींचा विश्वास संपादन करण्यात आला. (Life Certificate Scam) त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातील ४ लाख ५० हजार रुपये परस्पर ऑनलाइन हस्तांतरित करून त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

याप्रकरणात बँक ऑफ इंडिया, कोलकाता येथील खात्याचा वापर झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. खातेधारक म्हणून अशोक मुखर्जी यांचे नाव नोंदवण्यात आले आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६(ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शेलार करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×