अधिकृत पासधारक असल्याचे भासवून विनातिकीट प्रवास केल्याचा आरोप
marathinews24.com
पुणे – PMPML Bus Pass Fraud : पीएमपी बसचा बनावट एकदिवसीय पास तयार करून अधिकृत पासधारक असल्याचे भासवत बसमधून मोफत प्रवास करणाऱ्या तरुणाविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे पीएमपीएलची ७० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. निशांत राजपाल कोहले (वय २६, रा. हडपसर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी बस चेकर संजय भगुजी आढागळे (वय ५६) यांनी फिर्याद दिली आहे.
अल्पवयीनाशी अश्लील कृत्य; खाजगी शिकवणी चालकाविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने स्वतःच्या फायद्यासाठी पीएमपी बसचा एकदिवसीय बनावट पास तयार केला. हा पास अधिकृत असल्याचे भासवून त्याने बस क्रमांक एमएच १२ एक्सएम ६९५८ मधून विनातिकीट प्रवास केला. या प्रकारामुळे पीएमपीची ७० रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस कर्मचारी नलवडे या करत आहेत.




















