POCSO अंतर्गत गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – खासगी शिकवणी चालकाने १२ वर्षीय मुलाशी अश्लील कृत्य करुन त्याला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी शिक्षकाविरुद्ध खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दत्ता लांडगे (रा. जय को-ऑपरेटिव्ह सोसायटी, घोरपडे पेठ) याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो), अश्लील कृत्य करणे, तसेच मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भटक्या श्वानावरुन वाद; दाम्पत्याला मारहाण – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी खासगी शिकवणी वर्ग चालवितो. घोरपडे पेठेतील त्याच्या घरी तो मुलांची शिकवणी घेतो. तक्रारदार महिलेचा १२ वर्षीय मुलगा त्याच्याकडे शिकवणीसाठी जातो. आरोपीने मुलाला शयनगृहात नेले. त्याला पुस्तक वाचण्यास सांगितले. शिकवण्याच्या बहाण्याने त्याने मुलाशी अश्लील कृत्य केले. मुलाने त्याला विरोध केल्यानंतर त्याला मारहाण केली. त्याला शिकवणी वर्गातून जाण्यास सांंगितले. जुलै महिन्यापासून आरोपी मुलाशी अश्लील कृत्य करत होता. मुलाने याबाबत नुकतीच आईला माहिती दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.




















