Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Maharashtra Drought 2026 : राज्यात दोन टप्प्यांत दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता…

Maharashtra Drought 2026

२७ जिल्ह्यांतील १३९ तालुक्यांची यादी आली समोर 

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिकांना राज्यात मोठा फटका बसला आहे. (Maharashtra Drought 2026) या पार्श्वभूमीवर राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड आणि सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या २७ जिल्ह्यांतील १३९ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा पहिला ट्रिगर लागू करण्यासारखी परिस्थिती असल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. हा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे.

पदवीधर, शिक्षक मतदार नोंदणी मुदत २६ सप्टेंबरपर्यंत; ऑनलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध – सविस्तर बातमी 

दरम्यान, दुष्काळाचा दुसरा ट्रिगर तपासण्यासाठी या तालुक्यांची माहिती महालनोबिस राष्ट्रीय पीक अंदाज केंद्राकडे (MNCFC) पाठवण्यात आली आहे. दुष्काळाच्या अंतिम घोषणेसाठी केवळ पाऊसच नव्हे, (Maharashtra Drought 2026) तर पीकस्थिती, जमिनीतील ओलावा, वनस्पती निर्देशांक आणि इतर परिणामकारक घटकांचाही विचार केला जातो.

१३९ तालुक्यांमध्ये पहिला ट्रिगर लागू होण्याची दाट शक्यता

राज्याच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार, राज्यातील ऐकून १३९ तालुक्यांमध्ये पावसाचा खंड २१ दिवसांपेक्षा अधिक आहे. मात्र जमिनीच्या प्रकारानुसार हा कालावधी बदलतो. हलक्या जमिनीसाठी २१ दिवसांचा, तर भारी जमिनीसाठी २८ दिवसांचा पावसाचा खंड विचारात घेतला जातो.

तसेच सात जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. राज्यातील १७५ तालुक्यांमध्ये सरासरीच्या ७५ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील मूल्यांकनानंतर दुष्काळाच्या कक्षेत येणाऱ्या तालुक्यांची संख्या वाढू शकते.

कोणत्या विभागातील तालुक्यांचा समावेश आहे पुढीलप्रमाणे 

ठाणे विभाग : ठाणे जिल्ह्यातील कल्याण, मुरबाड, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ; रायगडमधील पनवेल, कर्जत, पेण; पालघरमधील डहाणू, तलासरी, विक्रमगड. (Maharashtra Drought 2026)

नाशिक विभाग : नाशिकमधील इगतपुरी, मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगाणा, सिन्नर, येवला; धुळ्यातील धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा; नंदुरबारमधील नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा; जळगावमधील जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, एरंडोल, पारोळा, जामनेर, पाचोरा, धरणगाव, बोदवड आदी तालुके.

पुणे विभाग : अहिल्यानगरमधील पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता. पुणे जिल्ह्यातील हवेली, भोर, वेल्हे, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर. सोलापूरमधील बार्शी, मोहोळ, करमाळा, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा.

कोल्हापूर विभाग : सातारा जिल्ह्यातील पाटण, खटाव, माण, फलटण, खंडाळा; सांगलीतील मिरज, आटपाडी, कवठेमहांकाळ; कोल्हापूरमधील चंदगड आणि राधानगरी.

छत्रपती संभाजीनगर विभाग : छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर, कन्नड, सिल्लोड, सोयगाव; जालन्यातील अंबड, परतूर, बदनापूर, घनसावंगी, मंठा; बीडमधील आष्टी, गेवराई, माजलगाव, परळी, धारूर, शिरूर कासार.

लातूर विभाग : लातूरमधील रेणापूर; धाराशिवमधील धाराशिव, तुळजापूर, परंडा, भूम; परभणीतील पाथरी आणि मानवत.

अमरावती विभाग : बुलढाण्यातील जळगाव जामोद, बुलढाणा, मेहकर, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा; अकोल्यातील बाळापूर, पातूर, अकोला, बार्शीटाकळी; वाशिममधील मंगरुळपीर, मानोरा, कारंजा; अमरावतीमधील भातकुली, दर्यापूर; यवतमाळमधील दारव्हा.

नागपूर विभाग : वर्ध्यातील वर्धा आणि देवळी; गोंदियातील तिरोडा आणि सालेकसा; गडचिरोलीतील कुरखेडा, धानोरा आणि एटापल्ली.

अंतिम दुष्काळ जाहीर होण्यासाठी पुढील प्रक्रिया काय असेते पुढीलप्रमाणे

(Maharashtra Drought 2026)  पहिला ट्रिगर लागू झाल्यानंतर दुष्काळाच्या परिणामकारक स्थितीचे मूल्यांकन केले जाते. यात पीकस्थिती, जमिनीतील ओलावा, उपग्रहाधारित वनस्पती निर्देशांक आणि जलस्थिती यांसारख्या बाबींचा समावेश असतो. त्यानंतर प्रत्यक्ष क्षेत्रीय पाहणी आणि पंचनाम्यांच्या आधारे अंतिम निर्णयाची प्रक्रिया पुढे जाते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ सप्टेंबरला सरकार दुष्काळ संहितेनुसार पहिल्या ट्रिगरअंतर्गत आवश्यक आदेश काढणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता सरकारच्या अधिकृत निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Drought 2026)

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×