Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य पुणे व बारामती दौऱ्यावर

शासकीय योजनांचा महामेळाव्याचे

दिनांक २४ व २५ सप्टेंबर रोजी पुणे व बारामती येथे दोन दिवसीय दौऱ्यावर

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य (संसदीय दर्जा) गोरक्ष लोखंडे हे दिनांक २४ व २५ सप्टेंबर रोजी पुणे व बारामती येथे दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहे.

नवरात्रोत्सवात“अंबाबाई” गाणं प्रदर्शित, गाण्यातून दिला सामाजिक संदेश – सविस्तर बातमी 

दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील समिती सभागृहात कुलसचिव पुणे विद्यापीठ यांच्या उपस्थितीत अनुकंपा बाबत, लाड पागे बाबत, तसेच शिष्यवृत्ती संदर्भात मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत आढावा बैठकीचे आयोजन. दुपारी ४.०० वाजता शासकीय विश्रामगृह, पुणे येथे मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांच्या सोबत “दलित वस्ती सुधारणा योजना” संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी पुणे येथून शासकीय विश्रामगृह, बारामती येथे पोहचतील. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता विद्या प्रतिष्ठानचे कला वाणिज्य महाविद्यालय, बारामती येथे संविधान विषयक जागृतीबाबत मार्गदर्शन करतील. यानंतर पंचायत समिती, बारामती व जिल्हा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.

तरी नागरिकांनी त्यांच्या समस्यांबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य (संसदीय दर्जा) गोरक्ष लोखंडे यांचेकडे सादर करावेत असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×