Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

नवरात्रोत्सवात“अंबाबाई” गाणं प्रदर्शित, गाण्यातून दिला सामाजिक संदेश

नवरात्रोत्सवात“अंबाबाई” गाणं प्रदर्शित, गाण्यातून दिला सामाजिक संदेश

लोककलावंतांची व्यथा, सोशल मीडियावर गाण्याची चर्चा

marathinews24.com

पुणे – दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांच्या “पावन जेवला काय” आणि सबसे कातिल गौतमी पाटीलच्या “चीज लई कडक” या सुपरहिट गाण्यांचे दिग्दर्शन केलेल्या दिग्दर्शकाचे नवीन गाणं आपल्या भेटीला आले आहे. नवरात्रोत्सवा निमित्त जेएसबी प्रोडक्शन प्रस्तुत आणि विकी वाघ दिग्दर्शित “अंबाबाई” गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळतं आहे.

समाजकार्य उभारण्यासाठी मोठी स्वप्ने पहा- शेखर मेहता – सविस्तर बातमी 

करण गायकवाड, नेहा पोसरेकर, योगिता माने, संतोष पाखरे आणि विकी वाघ यांनी या गाण्यात प्रमुख भुमिका साकारली आहे. विकी वाघ याने हे गाण लिहीलं असून या गाण्याची गीतरचना, संगीत आणि दिग्दर्शन ही केले आहे. या गाण्याची निर्मिती जेएसबी प्रोडक्शन यांनी केली आहे. हे गाणं कोल्हापूर येथे चित्रीत करण्यात आले आहे.

दिग्दर्शक विकी वाघ गाण्याच्या संकल्पनेविषयी सांगतो, “मला खूप दिवसांपासून एखाद एनर्जेटिक गाणं करायचं होत. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मी “अंबाबाई” गाणं लिहायला घेतलं आणि ते करताना गाण्याचं कंपोझिशनही मला सुचलं. मग या गाण्याला जसा आवाज हवा होता त्यासाठी आम्ही बरेच प्रयोग केले आणि शेवटी मी गाण रेकॉर्ड करायचं ठरवलं. मला अंबाबाईच्या त्या भक्तांबद्दल बोलायचं आहे ज्यांना आपण कायम दुर्लशीत करतो किंवा त्यांना आपण योग्य ती वागणूक देत नाही. किन्नर, संबळ वादक, वासुदेव, लावणी कलावंत, गोंधळी, जोगवा मागणाऱ्या जोगतीण या महाराष्ट्रातील पिढ्यान पिढ्या आपला वारसा व संस्कृती जपणाऱ्या लोककलावंतांना मी “अंबाबाई” गाण्यामार्फत आदरांजली अर्पण करतो.”

“अंबाबाई गाण संपूर्ण टीमने न झोपता सलग २४ तास शूट केल कारण अंबाबाई गाण्याच्या एनर्जीने आम्हाला ती ताकद दिली. या गाण्यातून प्रेक्षकांना “सगळ्यांचा आदर करा” हा संदेश मिळतो. प्रेक्षकांचा गाण्याला मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहता. हे गाणं आणि या गाण्यामार्फत समाजाप्रतीचा संदेश प्रेक्षकांना आपलस करेल यात शंका नाही. माझी रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी माझ्या इतर गाण्यांप्रमाणे “अंबाबाई” गाण्याला खूप प्रेम द्या. तुम्हा सर्वांना नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा.”

Link – yt.openinapp.co/sspfh

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×