Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

बालेवाडीजवळ पादचारी महिलेचे २ लाखांचे मंगळसूत्र हिसकावले

ज्येष्ठ महिलेचे दोन लाखांचे मंगळसूत्र हिसकावले

चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – रस्त्याने पायी चाललेल्या महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी तिच्या गळ्यातील १ लाख ८९ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना २२ सप्टेंबरला रात्री नउच्या सुमारास बालेवाडीतील लहु बालवडकर यांच्या कार्यालयाजवळ घडली आहे. याप्रकरणी बाणेरमध्ये राहणार्‍या ३५ वर्षीय महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार दोघा चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक, कोयता जप्त – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कुटूंबियासह बाणेरमध्ये राहायला असून, २२ सप्टेंबरला रात्री नउच्या सुमारास महिला बालवडकर यांच्या कार्यालयाजवळून पायी जात होती. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेचा पाठलाग केला. त्यांच्या गळ्यातील १ लाख ८९ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे सुसाट पसार झाले. महिलेने आरडाओरड करेपर्यंत चोरटे नजरेआड गेले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण तपास करीत आहेत.

गुलटेकडी परिसरात घरफोडी, सव्वा लाखांचे दागिने चोरीला

पुणे- बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ लाख २२ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना २२ सप्टेंबरला मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास गुलटेकडी परिसरातील श्रीकृष्ण अपार्टमेंटमध्ये घडली आहे. याप्रकरणी एकाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कुटूंबियासह गुलटेकडी परिसरातील श्रीकृष्ण अपार्टमेंटमध्ये राहायला आहेत. २२ सप्टेंबरला मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील कपाटातून १लाख २२ हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. याप्रकरणी तक्रारदाराला चोरीची माहिती झाल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक बी. पी. शिरसट तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×