येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – पादचारी महिलेचे १ लाख ६० हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना कोंढव्यातील येवलेवाडी भागात घडली.
याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत महिलेने येवलेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मोबाइल चॅटींगबाबत जाब विचारल्याने पत्नीचा खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोंढवा भागात राहायला आहेत. त्या शनिवारी (२ एप्रिल) रात्री साडेआठच्या सुमारास येवलेवाडी परिसरातून निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडा-ओरडा केला. चोरटे दुचाकीवरुन पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील नेवसे तपास करत आहेत.
पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेची बांगडी चोरीला
पुणे-पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या हातातील ८० हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला पिंपरी परिसरात राहायला आहेत. त्या रविवारी (३ एप्रिल) पिंपरीतील मोरवाडी ते पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर या मार्गावरील पीएमपी बसने सकाळी प्रवास करत होत्या.
प्रवासादरम्यान गर्दीत चोरट्यांनी महिलेच्या हातातील सोन्याची ८० हजारांची बांगडी कटरचा वापर करुन कापून नेली. बालाजीनगर परिसरात त्या पीएमपी बसमधून उतरल्या. तेव्हा बांगडी चोरीला गेल्याचे लक्षात आले. पोलीस कर्मचारी कांबळे तपास करत आहेत.






















