Breking News
डिजिटल गोल्ड’मध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ९४ लाखांची फसवणूकघर खरेदी करुन देण्याच्या आमिषाने ज्येष्ठाची फसवणूकPune Crime : समलैंगिक पतीकडून महिलेचा छळअनुसूचित जातींचे उपवर्गीकरण जातीय जनगणनेनंतरच करावे‘चरणसेवा’ने जपले लाखो वारकऱ्यांचे आरोग्य; ४.९६ लाखांहून अधिक वारकऱ्यांना लाभउपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बारामती एमआयडीसीमध्ये स्वच्छता अभियानाचा शुभारंभमहिलांची सुरक्षा, सन्मान, आणि स्वातंत्र्य ही सामुहिक जबाबदारी- विजया रहाटकरपुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून १ लाखाहून थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीतरूणाला शेअरमधील गुंतवणूक पडली ५३ लाखांनासराईत दोन किलोमीटर पळाला, बिल्डींगवरही लपला

Crime News : मोबाइल हरवला अन पावणे दोन लाखांची ऑनलाइन फसवणूक

अतिरेक्यांकडे मोबाइल क्रमांक सापडल्याची बतावणी

चोरट्याने त्यांच्या मोबाइलमधील क्रेडीट आणि डेबीट कार्डचा वापर करून तरुणाला  घातला गंडा 

marathinews24.com

पुणे Crime News : मोबाइलमध्ये क्रेडीट कार्ड आणि डेबीट कार्डचा फोटो काढून जतन करणे एकाला महागात पडले आहे. मोबाइल हरविल्याचा गैरफायदा घेत चोरट्याने त्यांच्या मोबाइलमधील क्रेडीट आणि डेबीट कार्डचा वापर करून तब्बल १ लाख ८० हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी मुंबईतील तरूणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

वडगाव बुद्रूकमध्ये घरफोडी, एक लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण मुंबईचा रहिवाशी असून, त्याचा मोबाइल बंडगार्डन परिसरात हरविला होता. तरूणाच्या मोबाइलमध्ये क्रेडीट आणि डेबीट कार्डचे फोटो होते. चोरट्यांनी त्याचा गैरवापर करून बँकखात्यातील १ लाख ८० हजारांची रक्कम वेगवेगळ्या बँकखात्यात वर्ग केले. बँकेतून रक्कम कमी झाल्याचा मेसेज आल्यानंतर तक्रारदाराला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानुसार त्याने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक संदीप खेडकर तपास करीत आहेत.

जेष्ठ महिलेचे सव्वा लाखांचे मंगळसूत्र चोरले

Crime News : संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दर्शन घेत असताना चोरट्यांनी जेष्ठ महिलेच्या गळ्यातील १ लाख २५ हजार रूपये किंमतीचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना २२ जूनला सकाळी साडेआठच्या सुमारास भैरोबानाला चौक, फातिमानगर चौकादरम्यान घडली आहे. याप्रकरणी मुंढव्यात राहणार्‍या ६५ वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला मुंढव्यात राहायला असून, २२ जूनला सकाळी आठच्या सुमारास भैरोबानाला चौक, फातिमानगर चौकात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सव्वा लाखाचे मंगळसूत्र चोरून नेले. काही वेळानंतर महिलेला गळ्यात मंगळसूत्र दिसून आले नाही. त्यानंतर त्यांनी वानवडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शशिकांत लोंढे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×