Breking News
Pune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्याPune Mobile Theft Case : मोबाईल चोरणारा २४ तासांत जेरबंद; लक्ष्मीनगर पोलिसांची कारवाईMaharashtra Education News : दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नका; घेतले असल्यास परत करा

पुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

बुलेटचालकांसह शेकडो वाहनांवर कारवाई

marathinews24.com

पुणे – शहरात रात्री-अपरात्री फटाक्यासारखा आवाज काढणारे बुलेटचालक, कर्णकर्कश हाॅर्नचा वापर करणाऱ्या दुचाकीचालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करण्यास सुुरुवात केली आहे. सायलेन्सरमध्ये फेरफार (माॅडिफिकेशन) करणाऱ्या २७४ दुचाकीचालकांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याकडून पावणेतीन लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांपासून फेरफार केलेले सायलेन्सर बुलेटला बसविण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा प्रकारच्या सायलेन्सरमधून फटाक्यांसारखा आवाज येतो. दुचाकीस्वार कणकर्कश हाॅर्नचा वापर करतात. रात्री-अपरात्री उपनगरात फटाक्यांसारखा आवाज काढत बुलेटचालक जातात. अशा प्रकारच्या आवाजांमुळे नागरिकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो.

९३ लाखांची फसवणूक प्रकरणात पसार आरोपींना पकडले – सविस्तर बातमी

नागरिकांनी वेळोवेळी पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या. सायलेन्सरमधून फटाक्यासारखा आवाज काढणारे बुलेटचालक, तसेच कर्णकर्कश हाॅर्नचा वापर करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे. दुचाकीस्वार, बुलेटचालकांना फटाक्यासारखा आवाज काढणारे सायलेन्सर बसवून देणाऱ्या गॅरेजचालकांविरुद्ध पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे.

सायलेन्सरमध्ये बेकायदा फेरफार करणारे दुचाकीचालक आणि गॅरेजचालकांविरुद्ध ‘ऑपरेशन माॅडिफिकेशन’ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसात २७४ दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दोन लाख ७४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी फटाक्यासारखा आवाज काढणाऱ्या दुचाकीचालकांचे सायलेन्सर काढून ते जप्त केले आहेत. पोलिसांनी ८४ सायलेन्सर जप्त केले आहेत. यापुढील काळात फटाक्यासारखा आवाज काढणाऱ्या सायलेन्सरचा वापर करणाऱ्या दुचाकीचालकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. ही मोहीम यापुढील काळात सुरू राहणार आहे. दुचाकीस्वारांना वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस उपायुक्त डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×