आरोपींकडून अश्लील चाळे, लगट करण्याचा प्रयत्न
marathinews24.com
पुणे – शहरातील विविध भागातील अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार आरोपींना अटक करण्यात आली असून, आणखी तपास करण्यात येत आहे. अल्पवयीन मुलीकडे अश्लिल हातवारे करीत तिचा विनयभंग करणार्या तरूणावर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप दत्तात्रय मारणे (रा. वडगाव बुद्रुक) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. ही घटना ६ जुलैला सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला.
गॅसपुरवठा खंडीत करण्याची बतावणी करुन ज्येष्ठाची फसणूक – सविस्तर बातमी
दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलीच्या अंगावर अश्लिलपणे हात फिरवून तिचे चुंबन घेतल्याचा प्रकार येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. याप्रकरणी राजु ताज्जुद्दिन दबीर (वय ५५, रा. एनआयबीएम, कोंढवा) याच्यावर गुन्हा दाखल केला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत १७ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार ७ जुलै रोजी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास घडला. त्याच्यावर पॉस्कोच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसर्या गुन्ह्यात तरूणीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करून तिला तुम मेरे साथ डेट पे चलोगी क्या ? असे म्हणून हात पकडून अश्लिल स्पर्श करून मिठी मारत शरीर सुखाची मागणी करणार्या तरूणवर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेनी दिलेल्या फिर्यादीवरून कुमार संजीव (वय ३५, रा. भोपाळ मध्यप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२४ ते मार्च २०२५ दरम्यान घडला.
लग्नाचे आमिष दाखवून तरूणीला अत्याचार
लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना आंबेगाव परिसरात घडली आहे. याप्रकरणी महेश नवगिरे ( वय २३, रा. टिळेकरनगर, कोंढवा) याच्यावर आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २३ वर्षीय तरूणीने आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपीने तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शाररिक संबंध ठेवले. तिचे विवस्त्र फोटो सोशल मीडियावर शेअर करून बदनामी केली. आरोपीने तरूणीला इन्स्टाग्राम अकाउंट बंद करण्यास सांगितल्यानंतर तिने नकार दिला. त्यानंतर आरोपीने तिला मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद केले असून, आंबेगाव पोलीस तपास करत आहे.