Breking News
Khed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हेBaramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महात्मा फुले महसूल लोकअदालत

जागतिक सायकल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात साडेतीन हजाराहून अधिक सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग

महाळुंगे-बालेवाडीतील सायकल रॅलीत ३,५०० हून अधिक सायकलप्रेमींचा सहभाग

marathinews24.com

पुणे – जागतिक सायकल दिनानिमित्त महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात युवक कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने आयोजित उपक्रमाला सुमारे ३ हजार ५०० हून अधिक सायकलप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

उत्पादन, वितरण अन् बाजारपेठेची साखळी निर्माण करून महिला बचत गटांनी आर्थिक क्रांती करावी; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आवाहन – सविस्तर बातमी

या कार्यक्रमात सर्वांसाठी २५ किमी व ५० किमी अंतराच्या सायकल फेऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच ‘अस्मिता – खेलो इंडिया’ अंतर्गत महिला व मुलींसाठी विशेष ५ किमी, ७ किमी आणि १० किमी गट आयोजित करण्यात आले. शरीर तंदुरुस्त, पर्यावरण संवर्धन आणि सायकल संस्कृतीचा प्रसार हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी भारतीय क्रीडा प्राधिकरण व क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, महाराष्ट्र सायकल असोसिएशन आणि लोहा फाउंडेशन यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

या प्रसंगी सायकल रॅलीस महापौर मंजूषा नागपुरे, अर्जुन पुरस्कारार्थी शांताराम जाधव यांनी झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी अपर पोलीस महासंचालक कृष्ण प्रकाश, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल उपसंचालक संजय सबनीस, डाकार रॅली वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धक संजय टकले, जीएम – सेल्स अँड मार्केटिंग, अवोन सायकलचे व्यवस्थापक सुलेख कौशिक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, सायकलिंग फेडरेशन ऑफ महाराष्ट्रचे अभिजित मोहिते, क्रीडा प्रबोधनी बालेवाडीचे प्राचार्य तथा राज्य क्रीडा मार्गदर्शक दीपाली पाटील तसेच फीट इंडियाचे सदिच्छादूत कु. दीक्षा आणि कु. स्वप्नाली उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी सायकलिंगच्या माध्यमातून निरोगी जीवनशैली, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत वाहतुकीचा संदेश देत अशा उपक्रमांची आवश्यक असल्याचे अधोरेखित केली.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते अस्मिता सायकल स्पर्धेतील विजेत्या मुलींना पदक व सोडत पद्धतीने सायकली देण्यात आल्या

या उपक्रमाला लोहा फाउंडेशन, सायकलिंग संघटना महाराष्ट्र, देशी फार्म, मॅक्स प्रोटीन, अवोन सायकल्स, ऑक्सरीच, फुडस्ट्रॉंग, कोकोअ मेल्स, एपीसीसीआय नागोर, अस्मिता फाउंडेशन रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट ३१३१, बायसिकल मेयर ऑफ पिंपरी चिंचवड तसेच इतर संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×