हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – खुनाचा प्रयत्न करुन पसार झालेल्या सराइताला येवलेवाडी पोलिसांनी अटक केली. सराइताकडून देशी बनावटीचे पिस्तूल, काडतूस जप्त करण्यात आले. राहुल सुनील कुचेकर (वय २५, रा. जयशंकर इमारत, बिबवेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. कुचेकर याने सिंहगड रस्ता परिसरात एकाचा खुनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणात त्याच्याविरुद्ध हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर कुचेकर पसार झाला होता.
सायबर चोरट्यांकडून तरुणाची १५ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
सराईत कुचेकर हा कोंढवा परिसरातील येवलेवाडी भागात येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अभिजित जाधव आणि विजय खेंगरे यांना मिळाली. त्यानंतर येवलेवाडीतील पानसरेनगर भागात सापळा रचून त्याला पकडले. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस सापडले. कुचेकर याच्याविरुद्ध यापूर्वी कोंढवा, बिबवेवाडी, हवेली, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे पाच गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, एसीपी नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील, पोलीस निरीक्षक दीपक कारंडे, एपीआय स्वप्नील नेवसे, अरुण किटे, अभिजित जाधव, अभिजित रत्नपारखी, गणेश चिंचकर, लक्ष्मण होळकर, विजय खेंगरे, अनिल बनकर, मयूर मोरे, अक्षय शेंडगे यांनी केली.






















