Breking News
Pune Post Office Theft Attempt : रास्ता पेठेतील टपाल कार्यालयात चोरीचा प्रयत्नPune Mahalakshmi Temple Gold Saree : सुवर्णवस्त्रांनी सजली सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीMakarand Anaspure : विद्यार्थीपण आहे तोपर्यंतच जगण्याला अर्थ- मकरंद अनासपुरेMLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजन

सायबर चोरट्यांकडून तरुणाची १५ लाखांची फसवणूक

कस्टमने पकडल्याचे सांगून तरुणीची २२ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सायबर चोरट्यांकडून तरुणाची १५ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका तरुणाने फिर्याद दिली आहे. तक्रारदार ३० वर्षीय तरुण हडपसर भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर १३ फेब्रुवारी रोजी संदेश पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने उत्पादनांची खरेदी-विक्री व्यवहारात चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी तरुणाला दाखविले.

हडपसरमध्ये वैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार – सविस्तर बातमी

चोरट्यांनी तरुणाला एक लिंक पाठविली. या लिंकमध्ये तरुणाला त्याची माहिती देण्यास सांगितले. चोरट्यांच्या खात्यात तरुणाने गेल्या दीड महिन्यात वेळोवेळी १५ लाख ३१ हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी तरुणाला परतावा दिला नाही. चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर तरुणाने संपर्क साधला. मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×