वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – वैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केल्याची घटना हडपसर भागातील रामटेकडी परिसरात घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी दोघांना अटक केली. याबाबत मीरा धनंजय पवार (वय ४९, रा. रामटेकडी, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सचिन रावसाहेब शिरसाठ (वय ३०, रा. रामटेकडी, हडपसर), संदेश दावींद भंडारकर (वय २४, रा. गंगानगर, हडपसर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेल्या अल्पवयीन साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पादचारी महिलेचे दीड लाखांचे मंगळसूत्र हिसकावले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मीरा पवार यांच्या मुलाचे आरोपी शिरसाठ, भंडारकर आणि साथीदारांशी वाद झाले होते. रविवारी (३ मे) रात्री नऊच्या सुमारास पवार यांचा मुलगा रामटेकडी परिसरातील दुर्गामाता मंदिराजवळ थांबला होता. त्या वेळी आरोपींनी पवार यांच्या मुलाला शिवीगाळ केली. त्यााला बांबूने मारहाण करुन तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक मोकाटे तपास करत आहेत.























