Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Neelam Gorhe : गणरायाला निरोप देताना सुरक्षितता, शिस्त आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Neelam Gorhe

दुष्काळ निवारणासाठी शाश्वत उपायांचा आढावा घेत शासनस्तरावर पाठपुरावा करणार – डॉ. नीलम गोऱ्हे

marathinews24.com

पुणे – पुणे शहरातील ऐतिहासिक व वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ आज लोकमान्य टिळक पुतळा, महात्मा फुले मंडई येथून झाला. यावेळी शिवसेना नेत्या व विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) उपस्थित होत्या. गणरायाला निरोप देताना त्यांनी गणेशभक्तांना शुभेच्छा देत पोलिसांनी केलेल्या सुरक्षा व्यवस्थेचे कौतुक केले.

श्रीगणेशा आरोग्याचा अभियानांतर्गत बारामती तालुक्यात आरोग्य शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद – सविस्तर बातमी 

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रासह देशभरात गणेश विसर्जनाचा उत्साह आणि भक्तिमय वातावरण आहे. गणरायाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांमध्ये मोठी श्रद्धा आणि ओढ आहे. सर्वप्रथम मी गणरायाला नमन करते. विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांची सुरक्षितता, सन्मान तसेच महिलांची सुरक्षितता आणि आरोग्य यासाठी पोलिसांनी चांगली व्यवस्था केली आहे. महिला आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचेही डॉ. गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी स्वागत केले.

दरम्यान, दुष्काळ निवारण आणि जलसंधारणाच्या प्रश्नावरही डॉ. गोऱ्हे यांनी पुढाकार घेतला आहे. केज, लातूर, अहमदपूर, तुळजापूर यांसह विविध तालुक्यांमध्ये जैवशेती, जलसंधारण आणि दुष्काळ निवारणासाठी काम करणाऱ्या संस्थांच्या त्या संपर्कात आहेत. या संस्थांच्या अनुभवातून दुष्काळाच्या समस्येवर शाश्वत मार्ग कसा काढता येईल, याबाबत लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

“दुष्काळग्रस्त भागातील स्थानिक अनुभव, जलसंधारणाची कामे आणि जैवशेतीच्या माध्यमातून उपलब्ध झालेले पर्याय यांचा अभ्यास करून शासनाकडे ठोस स्वरूपात पाठपुरावा केला जाईल,” असेही डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×