पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – Online Fraud Pune : क्रेडिट कार्ड मिळवून देण्याच्या बहाण्याने मोबाईलवरील व्हॉट्सअप स्क्रीन शेअर करण्यास सांगून एका व्यक्तीची दोन लाख ७३ हजार १८४ रुपयांची फसवणूक करण्यात आली. आरोपीने क्रेडिट कार्डला लिंक असलेला ई-मेल बदलून पैसे परस्पर ट्रान्सफर केले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर पर्वती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आशुतोष सुरेश मावळे (रा. फ्लॅट क्रमांक १००३, क्षितीज सोसायटी, सहकारनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. मावळे यांचे वय ५५ वर्षे आहे.
लग्नपत्रिकेच्या एपीके फाईलमधून ज्येष्ठाच्या खात्यावर डल्ला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २० ऑगस्ट ते दि. २५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ऑनलाईन फसवणूक झाली. नेमक्या वेळा उपलब्ध नाहीत. मावळे यांनी ऑनलाईन पोस्टवर क्लिक करून क्रेडिट कार्डसाठी मोबाईल क्रमांक पाठविला. Online Fraud Pune आरोपीने संपर्क साधून स्क्रीन शेअर करण्यास सांगितले. आधार कार्ड आणि अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डचे फोटो घेतले. कार्डला लिंक असलेला ई-मेल बदलून स्वतःचा ई-मेल जोडला आणि पैसे ट्रान्सफर केले. पोलिस निरीक्षक हिवरकर तपास करीत आहेत.
मोबाईलचा ऍक्सेस घेऊन ४ लाख ७२ हजार रुपये लंपास
पुणे- मोबाईलचा ऍक्सेस मिळवून खातेदाराच्या परवानगीशिवाय बँक खात्यातील चार लाख ७२ हजार ९९९ रुपये अनोळखी खात्यावर ट्रान्सफर करण्यात आले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश संजय वाघमारे (रा. ए विंग, फ्लॅट क्रमांक ७०६, लक्ष्मी विष्णुपुरम सोसायटी, देशमुखवाडी, शिवणे, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी ऑनलाईन फसवणूक झाली. आरोपीने वाघमारे यांच्या मोबाईलचा अॅक्सेस घेतला. त्यानंतर संमती न घेता बँक खात्यातील रक्कम अनोळखी खात्यावर पाठविल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दि. २ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक शिंपी तपास करीत आहेत.























