अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना ग्रीन सोल्युशन्सतर्फे जीवनगौरव पुरस्कार

चौदाव्या वर्धापनदिनी पर्यावरण क्षेत्रातील कार्याबद्दल आरती भोसले यांचा विशेष सन्मान

marathinews24.com

पुणे – प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात सेवा पुरवणाऱ्या देशातील अग्रणी ग्रीन सोल्युशन्स संस्थेच्या दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांना जाहीर झाला आहे. ग्रीन सोल्युशन्सच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या शनिवारी (ता. २३) सायंकाळी ५.३० वाजता हॉटेल ऑर्चिड, बालेवाडी, पुणे येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण प्रसिद्ध वक्ते व संपादक संजय आवटे यांच्या हस्ते होणार आहे.

कृतज्ञ भावनेची जोड देत प्रसाद नगरकर यांनी आई-वडिलांना भेट दिली आलिशान ‘मर्सिडीज-मेबॅक’ – सविस्तर बातमी

तसेच भारत-नॉर्वे ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप समिटमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्योग प्रतिनिधी मंडळातील टॉप २० प्रतिनिधींमध्ये निवड झालेल्या पुण्यातील ग्रीनएक्स एन्व्हायर्नमेंटलच्या संस्थापक व व्यवस्थापकीय संचालिका आरती भोसले यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त सहसंचालक शंकर वाघमारे, निवृत्त प्रादेशिक अधिकारी एल. एस. भड व निवृत्त उपप्रादेशिक अधिकारी किशोर केर्लीकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

ग्रीन सोल्युशन्स संस्थेने गेल्या १४ वर्षांत देशविदेशातील हजारो उद्योगांमधे प्रदूषण नियंत्रण यंत्रणा उभारली आहे. संस्थेमार्फत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संमतीपत्र, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विषयक अनुज्ञप्ती, पर्यावरण विषयक अनुज्ञप्ती व संलग्न सेवा दिल्या जातात. ग्रीनेक्स एनव्हायरंमेंटलमार्फत उद्योजकांना लाईफ सायकल असेसमेंट, एनव्हायरंमेंटल प्रॉडक्ट डिक्लरेशन (इपीडी), कार्बन क्रेडिट, नेट झीरो इत्यादी सेवा पुरविण्यात येतात, असे ग्रीन सोल्युशन्सचे संस्थापक सागर अहिवळे यांनी नमूद केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×