Breking News
ठेकेदाराच्या कुटुंबाला धाक दाखवून २७ लाखांची घरफोडीमहात्मा जोतीराव फुले द्विजन्मशताब्दी वर्षानिमित्त पशुसंवर्धन विभागाचे विविध उपक्रमपुण्यात नवले ब्रीज परिसरात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाशअल्पवयीन मुलाशी अश्लील कृत्य; तिघांविरुद्ध गुन्हाकात्रजमध्ये अल्पवयीनावर शस्त्राने वार करून खून‘मिशन क्रॅकडाऊन’ अंतर्गत बेकायदा धंद्यांवर कारवाईदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त बारामती एमआयडीमध्ये १ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन-प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटीलअंगणवाडीच्या पोषण आहारात बदल; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलावविद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गतीडंपरच्या धडकेत पदाचारी ठार, पुणे महापालिकेजवळील अपघात

पीएम कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंप प्रलंबित आस्थापना व तक्रार निवारण कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

पीएम कुसुम योजनेअंतर्गत सौर कृषीपंप प्रलंबित आस्थापना व तक्रार निवारण कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

बारामती, इंदापूर व दौंडमधील लाभार्थी शेतकऱ्यांच्या तक्रारींवर तत्काळ उपाययोजनांचे निर्देश

marathinews24.com

बारामती – महाऊर्जा विभागीय कार्यालय, पुणे यांच्या वतीने आज दि. १२ जून २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता कृषी विभाग फळ रोपवाटिका, कन्हेरी, ता. बारामती, जि. पुणे येथे प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान (पीएम-कुसुम) योजनेअंतर्गत प्रलंबित सौर कृषीपंप आस्थापना गतीमान करणे तसेच लाभार्थी शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्याच्या उद्देशाने विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

मुख्यमंत्री बळीराजा शेत, पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण रस्ते निर्माण करावेत-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – सविस्तर बातमी 

या कार्यशाळेस बारामती, इंदापूर व दौंड तालुक्यातील ज्या लाभार्थी शेतकऱ्यांचे सौर कृषीपंप अद्याप बसविण्यात आलेले नाहीत अथवा बसविण्यात आलेले असले तरी ते कार्यान्वित नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत, अशा लाभार्थ्यांना विशेषतः निमंत्रित करण्यात आले होते.

कार्यशाळेस महाऊर्जा विभागीय कार्यालय, पुणे येथील विशाल सावंत उपस्थित होते. तसेच पीएम-कुसुम योजनेअंतर्गत कार्यरत पुरवठादार कंपन्यांचे प्रतिनिधी सौरभ खांडेकर (ओसवाल पंप), पांडुरंग किसवे (पर्ल एंटरप्राइजेस), अक्षय बोराटे (रेडियन सोलर), दादा खारतोडे (स्पॅन पंप) आणि बालाजी पाटील (सी.आर.आय. पंप) यांनी सहभाग नोंदविला.

कार्यशाळेदरम्यान उपस्थित लाभार्थी शेतकऱ्यांच्या विविध तक्रारी, अडचणी व सूचना यांची सविस्तर नोंद घेण्यात आली. प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्रपणे आढावा घेऊन संबंधित पुरवठादार कंपन्यांना प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या तसेच तांत्रिक अडचणी दूर करून सौर कृषीपंप कार्यान्वित करण्याच्या सूचना महाऊर्जा कार्यालयामार्फत देण्यात आल्या.

यावेळी शेतकरी, पुरवठादार कंपन्या आणि महाऊर्जा कार्यालय यांच्यात समन्वय साधून लाभार्थ्यांच्या समस्यांचे जलद व प्रभावी निराकरण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. अशा प्रकारच्या समन्वयात्मक कार्यशाळांमुळे सौर कृषीपंपांची प्रलंबित आस्थापना पूर्ण होण्यास गती मिळणार असून, कार्यान्वित सौर कृषीपंपांचा शेतकऱ्यांना अधिक प्रभावीपणे लाभ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

तसेच सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर, सिंचनासाठी अखंडित व स्वस्त ऊर्जा उपलब्धता आणि शेती उत्पादन खर्चात बचत यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थित शेतकरी, पुरवठादार कंपन्यांचे प्रतिनिधी आणि महाऊर्जा कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×