Breking News
पुण्यात १२ हजार ७५० विद्यार्थ्यांना मिळणार ‘अंकनाद गणित सात्मीकरण प्रणालीबालमैत्रीपूर्ण आश्रमशाळा उपक्रम आदिवासी मुलांसाठी संरक्षणात्मक वातावरण करण्यास उपयुक्त-प्रदीप देसाईखराडी पार्टी प्रकरणात पोलिसांची कारवाई एकतर्फीछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना; यवतमध्ये ३१ जुलैला रस्ता रोकोॠषिकेश ते रामेश्वरम गौ राष्ट्र यात्रेचे पुण्यात उत्साहात स्वागतसैनिक व त्यांच्या कुटुंबांच्या सन्मानासाठी विधी सेवा चिकित्सालय केंद्राचे ठोस पाऊल – आयुक्त पुलकुंडवारजिल्ह्यातील वनपर्यटनात मोठ्या क्षमता; पर्यावरणपूरक पद्धतीने पर्यटकांसाठी सुविधा निर्माण कराव्यातलायन्स क्लब पूना शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी डॉ. गणेश खामगळ यांची निवड‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर-2026’द्वारे पुणे व महाराष्ट्रातील पर्यटन क्षमता आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्शविण्याची संधीटिळक रोड वरील विसर्जन मिरवणूक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने वेळेआधी संपविण्याचा प्रयत्न करू..

पोलीस बंदोबस्तामुळे पालखी सोहळा सुरळीत

साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त पालखी मार्गासह शहर परिसरात तैनात होता

marathinews24.com

पुणे – पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने वारकरी, दर्शनासाठी भाविकांची उसळलेली गर्दी अशा भक्ती जल्लोषात शुक्रवारी पुणे पोलिसांनी बंदोबस्त पार पाडला. रात्री दहाच्या सुमारास श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा नाना-भवानी पेठेत मुक्कामी दाखल झाला.

भक्ती आणि योगाच्या माध्यमातून आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी प्रयत्न करूया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा शुक्रवारी (२० जून) शहरात दाखल झाला. पालखी सोहळ्यातील बंदोबस्ताचे नियोजन पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, मनोज पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. साडेसहा हजार पोलिसांचा बंदोबस्त पालखी मार्गासह शहर परिसरात तैनात करण्यात आला होता. हजारो भाविकांच्या गर्दीचे नियोजन करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.

पालखी सोहळ्यातील अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताची आखणी केली होती. पालखी मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह साडेसात हजार पोलीस बंदोबस्तात सहभागी झाले. श्री ज्ञानेश्वर महाराज आणि श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंडी, वारकऱ्यांना दुतर्फा झालेल्या गर्दीतून वाट करुन देण्यासाठी पोलिसांनी खास वेगळा बंदोबस्त ठेवला होता.

प्रथेप्रमाणे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील नरवीर तानाजीवाडी परिसरात दोन्ही पालख्या दुपारी विसाव्यासाठी दाखल झाल्या. तेथेे भाविकांची गर्दी झाली होती. पालख्यांचे आगमन, मुक्काम, तसेच पालखी सोहळा मार्गस्थ होईपर्यंत पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले असून माऊली-माऊली जयघोषात पोलिसांना पालखी आगमन सोहळ्याचा बंदोबस्त पार पडला. रात्री दहाच्या सुमारास श्री तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील निवंडुग्या विठोाबा मंदिरात दाखल झाली. भवानी पेठेतील श्री पालखी विठोबा मंदिरात श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मुक्कामी दाखल झाली. समाजआरती झाल्यानंतर रात्री उशीरापर्यंत दोन्ही मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. शनिवारी (२१ जून) पालखी सोहळा शहरात मुक्कामी असणार आहे. रविवारी (२२ जून) पालखी सोहळा शहरातून मार्गस्थ होणार आहे.

पालखी आगमनापूर्वीच रस्ते बंद – मध्यभागात कोंडी

पालखी आगमनापूर्वी टप्प्याटप्पाने रस्ते बंद करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला होता. मात्र, लक्ष्मी रस्त्यासह मध्यभागातीाल प्रमुख रस्ते, तसेच पालखी मार्गावरील उपरस्ते सकाळीच बांबूचे अडथळे टाकून बंद केल्याने वाहतुकीची कोंडी झाली. त्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी होतात. पालखी सोहळा पाहण्यासाठी शहर आणि उपनगरांतील भाविकांची गर्दी होते.

पालखी मार्गावरील वाहतूक नियोजनासाठी यंदा पोलिसांनी टप्याटप्याने रस्ते बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. पालखी आगमनानिमित्त बंद असणारे प्रमुख रस्ते, उपरस्ते, पर्यायी मार्गांची माहिती पोलिसांनी जाहीर केली. पालखी सोहळा नेमका कोणत्या भागात आहे, याची माहिती देण्यासाठी लाईव्ह लोकेशन सुविधा पोलिसांनी उपलब्ध करून दिले.

शुक्रवारी सकाळपासून पालखी मार्ग, उपरस्ते बांबुचे अडथळे टाकून बंद करण्यात आल्याने वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले. सकाळीच रस्ते बंद केल्याने वाहनचालकही गोंधळून गेले. पालखी सोहळा सायंकाळी दाखल होणार होता. मात्र, सकाळपासून रस्ते बंद केल्याने गोंधळ उडाला. पालखी मार्गावर सकाळपासून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवला होता. लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्याला जोडणारे उपरस्ते बांबूचे अडथळे टाकून बंद करण्यात आल्याने वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांना मनस्तापाला सामाेरे जावे लागले. कामानिमित्त जाणाऱ्या नागरिकांना एक ते दीड किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी वळसा मारून जावे लागत होते. गल्ली-बोळात कोंडी झाली होती.

पालखी आगमनापूर्वी दिंडीतील वाहने पहाटे शहरात दाखल झाली. दिंडीतील वाहनांसह वारकऱ्यांना मार्गस्थ करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी सकाळपासून प्रमुख रस्ते वाहतुकीस बंद केले होते. दिंडीतील वाहनांना मुक्कामी जाण्यासाठी मार्ग उपलब्ध करून, दिंडीतील वाहने लावण्याची व्यवस्था, तसेच वारकऱ्यांची सुरक्षा विचारात घेऊन प्रमुख रस्ते अन्य वाहनांसाठी बंद करण्यात आले होते, अशी माहिती वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top