Breking News
फ्लॅटमध्ये आग, सिलेंडरचा स्फोट, कुटूंब बचावलेपुण्यात ज्येष्ठाच्‍या २२ कोटींच्‍या फसवणूक प्रकरणात आणखी चौघांना बेड्यासायबर चोरट्यांची कमाल; निवृत्त अधिकाऱ्याला पावणे सात कोटींना गंडापुण्यातील बुधवार पेठेत झाडाझडती, बांग्लादेशी महिला ताब्यातधक्कादायक; वडिलांनाच पेट्रोल टाकून जाळलेसरहद संस्थेला चेन्नईच्या भगवान महावीर फौंडेशनचा “राष्ट्रीय भगवान महावीर पुरस्कार ” जाहीरराज्यातील सर्वात मोठा सौर ऊर्जेचा महोत्सव पुण्यातपंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे १७ फेब्रवारी रोजी आयोजन‘इंटरनॅशनल अ‍ॅग्री हॅकाथॉन इन पुणे २०२६’ चे १५ ते १७ मे दरम्यान भव्यस्वरुपात आयोजन- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपुण्यात अडीच हजार बेशिस्त दुचाकीस्वारांंविरुद्ध कारवाईच्या जाळ्यात

पुण्यात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद

पुण्यात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद

वेगवेगळ्या घटनेत १९ लाखांचा ऐवज लांबविला

marathinews24.com

पुणे – पुण्यात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद – शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. विश्रांतवाडी, वारजे माळवाडी भागात सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १९ लाख रुपयांचा ऐवज लांबविला, तसेच कात्रज भागातील एका टायर विक्री दुकानातून चोरट्यांनी ५८ हजार रुपयाचे टायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू – सविस्तर बातमी 

वारजे माळवाडीतील पृथक काॅर्नर सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सात लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे २७ जुलै रोजी सदनिका बंद करुन नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने, लॅपटाॅप, मोबाइल संच असा सात लाख ७५ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. पोलीस उपनिरीक्षक नरळे तपास करत आहेत.

विश्रांतवाडीतील जयवंत सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिने, रोकड असा ११ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे आळंदी रस्त्यावरील कळस चौकातील जयवंत साेसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून ऐवज लांबविला. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.

टायर विक्री दुकानात चोरी

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात असलेल्या एका टायर विक्री दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी ५८ टायर लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एकाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारादाराचे गोकुळनगर परिसरात जय शंकर टायर हे दुकान आहे. चाेरट्यांनी दुकानाचा दरवाजा उचकटून ५९ हजारांचे टायर लांबविल्याची घटना नुकतीच घडली. पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तपास करत आहेत.

मद्य विक्री दुकानातून रोकड, मद्याच्या बाटल्या लांबविल्या

मद्य विक्री दुकानांचे कुलूप तोडून रोकड, तसेच मद्याच्या बाटल्या लांबविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. चोरट्यांनी बिबवेवाडी भागातील एका मद्य विक्रीचा दरवाजा उचकटून गल्ल्यातील रोकड आणि मद्याच्या बाटल्या असा सात लाख नऊ हजारांचा ऐवज लांबविला. याबाबत एकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराचे बिबवेवाडीतील कोठारी ब्लाॅक परिसरात मद्य विक्री दुकान आहे. चोरट्यांनी मद्य विक्रीचे दुकानाचा दरवाजा उचकटून गल्ल्यातील रोकड, मद्याच्या बाटल्या लांबविल्या. पोलीस उपनिरीक्षक दळवी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×