Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू

दुचाकी घसरल्याने अपघातात तरूण ठार, एकजण जखमी

वाकडेवाडी परिसरात अपघात

marathinews24.com

पुणे – ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू – भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागात घडली. अपघातात दुचाकीस्वार तरुण जखमी झाला. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.श्रेयस सचिन पाटील (वय २०) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवासी तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार कृश विशाल पारख (वय २०, रा. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलाॅजी, खालसा काॅलेजजवळ, माटुंगा, मुंबई) जखमी झाला आहे. याबाबत पारख याने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ट्रकचालक राहुल भीमराव तांदळे (वय ३० , रा. पनवेल, नवी मुंबई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अ‍ॅप आधारित रिक्षा-टॅक्सी-सेवेच्या निर्णयाचे स्वागत- डॉ. बाबा कांबळे – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार कृश आणि त्याचा मित्र श्रेयस हे सोमवारी (२८ जुलै ) दुपारी दीडच्या सुमारास मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागातून निघाले होत. त्यावेळी वाकडेवाडीतील एसटी स्थानकासमोर पाठीमागून भरधाव ट्कने दुचाकीला धडक दिली. अपघातात सहप्रवासी श्रेयस गंभीर जखमी झाला. दुचाकीस्वार कृश हा जखमी झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या श्रेयस याचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. सहायक पोलीस निरीक्षक भोसले तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×