Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

प्रवासी बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू

संगमवाडी येथील प्रवासी बस थांब्यावर घडली घटना

marathinews24.com

पुणे – प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी आराम बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना संगमवाडी येथील प्रवासी बस थांब्यावर घडली. या प्रकरणी प्रवासी बस चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रज्जू निषाद (वय ३९, रा. छत्तीसगड) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत बुधारु रामजी निषाद (वय ३५, सध्या रा. हिंजवडी) यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मित्राला व्हिडीओ पाठवत तरूणाची आत्‍महत्‍या – सविस्तर बातमी   

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निषाद यांचा भाऊ रज्जू हे संगमवाडी परिसरातून २३ मार्च रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास निघाले होते. त्या वेळी प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बसच्या थांब्याजवळ एक बसने रज्जू निषाद यांना धडक दिली. बसच्या धडकेत ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता बस चालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या निषाद यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता.

अपघातानंतर पसार झालेल्या बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विभुते तपास करत आहेत. संगमवाडी परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे (ट्रॅव्हल्स) थांबे आहेत. संगमवाडी ते येरवडा रस्त्यावर यापूर्वी प्रवासी बसच्या धडकेत पादचारी, दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×