Breking News
सुनावणी प्रक्रियेत दस्तऐवजीकरणाला प्राधान्य द्या : शीतल तेलीप्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्याच्या आधारे जनतेचा विश्वास संपादन करा-राज्यपाल जिष्णु देव वर्माआदिवासी आश्रमशाळांमध्ये सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान राबविण्याचा निर्णयराज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना ‘संसदरत्न’ पुरस्कारगणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या ३०० पर्यावरण मूर्तीमेट्रोची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करा : डॉ. नीलम गोऱ्हेतब्बल १०० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे; सराईत चोर जेरबंदशेअरमध्ये गुंतवणूकीच्या नावाखालीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे – राज्यपाल जिष्णु देव वर्माटेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

नवरात्रोत्सवात पादचारी महिलेचे दागिने हिसकावले

कोथरूडमधील घटना

marathinews24.com

पुणे – नवरात्रोत्सवात महिलांकडील दागिने हिसकावण्याचे सत्र सुरू आहे. कोथरूड भागात पादचारी महिलेच्या गळ्यातील ६० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.
महिलेने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चाेरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गांजा विक्रीच्या तयारीतील तस्कराला अटक; वानवडी पोलिसांची कारवाई – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कोथरूड भागातील शास्त्रीनगर परिसरात राहायला आहे. बुधवारी (२४ सप्टेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास महिला महात्मा सोसायटी परिसरातून निघाली होती. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पटारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या चोरट्यंचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.

बालेवाडी भागात दोन दिवसांपूर्वी पादचारी महिलेकडील दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले होते. शहर परिसरात गेल्या काही महिन्यंपासून पादचारी महिलांकडील दागिने हिसकावून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×