Breking News
Pune Crime : पुण्यातील लक्ष्मी रस्ता, विमाननगरला लुटीची घटनाKharadi News : ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी; तरुणाची आत्महत्याPune Crime News : पुण्यात वेगवेगळ्या भागात दोघांना लुटलेतडीपार केलेल्या तीन महिला ताब्यात; तडीपार आदेशाचा भंग केल्याचे उघडWomen Scientists Felicitation Pune : श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे महिला शास्त्रज्ञांचा सन्मानMaharashtra Drought Relief Measures 2026 : बंद पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करा; टँकरचा पर्याय शेवटी वापरा–महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेAnubandh Support Group Pune : एकटेपणावर मात करण्यासाठी अनुबंधसारखे आधारगट हवे- विजया रहाटकरDagdusheth Ganpati Trust : ‘दगडूशेठ’ गणपती ट्र्स्ट तर्फे ५०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्रPolice Constable Suspension : इन्स्टाग्रामवरील बातमीवर आक्षेपार्ह टिप्पणी भोवलीPune Crime News : तडीपारीचा आदेश धुडकावून आरोपी महिला शहरात आल्या

पिस्तूल विक्रीचा डाव उधळला, तिघांना अटक

येरवडा पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – बेकायदेशरित्या पिस्तूलाच्या विक्रीचा डाव येरवडा पोलिसांनी उधळून लावला असून, याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पिस्तूल, काडतुस, दुचाकी असा ९० हजारांचा ऐवज जप्त केला आहे. महेश अशोक कांबळे (वय २१, रा. भुगाव) गणेश तुळशीराम पवार (वय २२ रा. नांदेड सिटी) यश चंद्रकांत उरणकर (वय २२ रा. संभाजी चौक, पाषाण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

फ्लॅटचे कुलूप तोडून ३ लाखांचे दागिने चोरी – सविस्तर बातमी

येरवडा परिसरात बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणार्‍याविरूद्ध कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी दिले होते. त्यापार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक केशव दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किशोर बेरड पथकासह २८ जुलैला हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अमलदार बालाजी सोगे यांना तिघेजण चव्हाण चौकातून मुळीक फार्मकडे जाणार्‍या रस्त्यावर थांबल्याची माहिती मिळाली.

पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पिस्तूल, काडतुस, दुचाकी जप्त केली. ही कामगिरी उपायुक्त चिलुमूला रजनीकांत, एसीपी सुनील जैतापूरकर, वरिष्ठ निरीक्षक उमेश गित्ते, मुकूंद कोकणे, शैलेश वाबळे, संदीप जायभाये, नटराज सुतार, गणेश पालवे, साईनाथ म्हस्के, अनिल मन्हाळकर, सोमनाथ गायकवाड यांनी केली.

जुन्या वादातून तरूणावर वार, तिघांवर गुन्हा दाखल

जुन्या भांडणाच्या वादातून टोळक्याने तरूणावर शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केले आहे. ही घटना १ ऑगस्टला दुपारी एकच्या सुमारास पुणे-बंगलोर रस्त्यावरील हॉटेल पुरंदरजवळ घडली आहे. याप्रकरणी तरूणाने नर्‍हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण मानाजीनगर नर्‍हे परिसरात राहायला असून, काही दिवसांपुर्वी त्याची आरोपीसोबत भांडण झाले होते. त्याच रागातून १ ऑगस्टला संबंधिताने साथीदारांना बोलावून घेतले. तक्रारदार तरूणाला अडवून त्याच्यावर शस्त्राने वार करून गंभीररित्या जखमी केले आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार खटावकर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×