Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

कुख्यात नीलेश घायवळ टोळीतील साथीदारांची पोलिसांनी काढली धिंड

कुख्यात नीलेश घायवळ टोळीतील साथीदारांची पोलिसांनी काढली धिंड

कोथरूडमध्ये तरुणावर केला होता गोळीबार

marathinews24.com

पुणे – रस्त्यावर गप्पा मारत थांबलेल्या तरुणाने दुचाकीला जाण्यास रस्ता दिली नाही, यावरून झालेल्या वादावादीतून सराईत निलेश घायवळ टोळीतील साथीदारांनी एकावर गोळीबार केला. त्यामुळे संबंधित तरुण गंभीर जखमी झाला होता. याप्रकरणी सहभागी असलेल्या आरोपींना ताब्यात घेऊन कोथरूड पोलिसांनी त्यांची धिंड काढली आहे. मयूर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राऊत, मयंक उर्फ मॉन्टी व्यास, आनंद चांदलेकर उर्फ अंड्या, दिनेश फाटक अशी धिंड काढलेल्या आरोपींची नावे आहेत.

घराचा दरवाजा उघडा असल्याची साधली संधी – सविस्तर बातमी 

कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील साथीदारांनी बुधवारी (दि. १७) रात्री पावणे बाराच्या सुमारास तरुणावर गोळीबार केला. हल्लात प्रकाश धुमाळ (वय ३६) हे जखमी झाले होते. त्यानंतर आरोपींनी वैभव साठे (वय १९) याच्यावर कोयत्याने वार करून त्याला जखमी केले होते. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोळीबार आणि कोयत्याचा वार करणाऱ्यांमध्ये गुंड निलेश घायवळ टोळीतील मयूर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राऊत, मयंक उर्फ मॉन्टी व्यास, आनंद चांदलेकर उर्फ अंड्या, दिनेश फाटक व अन्य साथीदारांचा समावेश होता.

आरोपींविरुद्ध विविध कलमांसह आर्म ॲक्ट अंतर्गत कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी धिंड काढल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान येरवडा पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यातील आरोपींचीही येरवडा पोलिसांनी धिंड काढली आहे. शिवीगाळ का करतो, याची विचारणा केल्याने संबंधित आरोपींनी दोन भावांवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून त्यांना जखमी केले होते. याप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई केलेल्या सचिन रावसाहेब तिजोरे आणि अक्षय सुरेश गायकवाड या आरोपींची त्याच भागात धिंड काढण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×