Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

घराचा दरवाजा उघडा असल्याची साधली संधी

हॉटेलमधील सव्वा दोन लाखांची रोकड चोरीला

नर्‍हे, खराडीत केली घरफोडी

marathinews24.com

पुणे – घराचे दरवाजे उघडे असल्याची संधी साधून चोरट्यांनी चोरी केली आहे. शहरातील नर्‍हे आणि खराडी परिसरातील इमारतीत शिरून चोरट्यांनी रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी सिंहगड रस्ता आणि खराडी पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

गांजा विक्री करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांना बेड्या; वानवडी पोलिसांच्या तपास पथकाची कामगिरी – सविस्तर बातमी 

नर्‍हेत दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी ४७ हजार ५०० रूपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना १९ सप्टेंबरला नर्‍हेतील भक्ती राधिका अपार्टमेंटमध्ये घडली आहे. याप्रकरणी एकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज पाहून चोरट्यांचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलीस अमलदार तारू तपास करीत आहेत.

खराडीतील थिटे वस्तीवरील कृपा इमारतीत एका घराचा उघडा असल्याचे पाहून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. घरातील डब्यातील १८ हजारांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा ९९ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अमलदार बुधवंत तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×