वानवडी पोलिसांच्या तपास पथकाची कामगिरी
marathinews24.com
पुणे – गांजा विक्री करण्याच्या प्रयत्नातील दोघा अट्टल गुन्हेगारांना वानवडी पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ३५ हजारांचा १ किलो ७३५ ग्रॅम वजन गांजा जप्त केला आहे. अविनाश श्रीरंग भोंडवे (वय ४१ रा. देशपांडे गार्डनजवळ, सिंहगड रोड) आणि संजय विश्वनाथ काथे (वय ३५ रा. गोसावी वस्ती, वैदुवाडी, हडपसर) अशी अटक केलेल्या अट्टल गुन्हेगारांची नावे आहेत.
सोलापूर-पुणे महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; प्रवाशांचा संताप – सविस्तर बातमी
वानवडी पोलिसांचे तपास पथक २० सप्टेंबरला हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडीक व पोलीस अंमलदार महेश गाढवे यांना ‘रामटेकडी इंडस्ट्रीयलजवळ श्रीनाथ फुड कंपनीसमोर दोघेजण गांजा विक्रीसाठी थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी धाव घेतली असता, लाल सॅक बॅग घेवुन दोघेजण थांबले असल्याचे दिसून आले. पोलिसांना पाहून आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाने शिताफीने त्यांना पकडले. त्यांच्या पिशवीची झडती घेतली असता, १ किलो ७३५ ग्रॅम गांजा मिळून आला.
आरोपी अविनाश भोंडवे आणि संजय काथे यांनी बेकायदेशिररित्या गांजा विक्री बाळगल्याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुमार डोके, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, उपनिरीक्षक सुधीर चौघुले, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, सर्फराज देशमुख, अतुल गायकवाड, अभिजित चव्हाण, गोपाळ मदने, यतीन भोसले, विष्णु सुतार, बालाजी वाघमारे, अमोल गायकवाड, अर्शद सय्यद, विठ्ठल चोरमले, आशिष कांबळे, दिपक क्षीरसागर यांनी केली.



















