Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

सोलापूर-पुणे महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; प्रवाशांचा संताप

सोलापूर-पुणे महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; प्रवाशांचा संताप

ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारक आणि प्रवाशांना प्रचंड त्रास

marathinews24.com

सोलापूर – राष्ट्रीय महामार्ग असलेल्या सोलापूर ते पुणे या २६५ किलोमीटर अंतरात ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारक आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावर तब्बल ५ टोल असून देखील रस्त्यांची दुर्दशा झाल्याने वाहन चालकांमध्ये संतापाची लाट आहे. जर खड्ड्याची दुरुस्ती केली नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा वाहन चालकांनी दिला आहे. दरम्यान, मोठ्या प्रमाणात असलेले खड्डे बुजवण्यासाठी जाणुन बुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वाहन चालकांनी केला आहे.

कोणत्या तरी जिंदादिलाच्या दर्शना आलो इथे..! जिंदादिल शायरीवर ॲड. प्रमोद आडकर यांचे सादरीकरण – सविस्तर बातमी 

देशातील महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गापैकी एक असलेल्या सोलापूर-पुणे आणि पुणे-सोलापूर असा परतीचा प्रवास करताना तब्बल ७५० रुपये टोल आकारला जातो. याशिवाय जीएसटी, मोटार वाहन नोंदणी कर भरल्यानंतर वाहन धारकांवर आर्थिक भुर्दंड बसत आहे. असे असतानाही त्यांना दर्जेदार रस्ता मिळत नाही. अशी खंत वाहन चालकांनी व्यक्त केली आहे. दर पावसाळ्यात महामार्गावर मोठमोठे खड्डे पडतात. त्यामुळे अपघातांची शक्यता वाढली असून, प्रवास अधिक त्रासदायक ठरत आहे.

टोल वसुली करूनही रस्त्यांची योग्य देखभाल न केल्याने संबंधित प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील रस्त्यांसारखे दर्जाहीन महामार्ग बांधले जात असतील तर राष्ट्रीय महामार्गाच्या गुणवत्तेचा काय उपयोग असा सवाल वाहन चालकांनी विचारला आहे. संपूर्ण २६५ किलोमीटरचा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात यावा. प्रवाशांना दिलासा द्यावा. अन्यथा वाहनधारकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×