Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

गर्भवती तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

विवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्या

कोंढव्यातील घटनेने खळबळ

marathinews24.com

पुणे – गर्भवती विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी कोंढवा भागात घडली आहे. खजुरा सुरेश सुनार (१९) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

दरोडा रोखताना पोलिसावर केला होता वार, सराईताला अटक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खजुरा आणि तिचा पती सुरेश हे मूळचे नेपाळचे आहेत. सुरेश सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. सुनार दाम्पत्याने कोंढवा भागात भाडेतत्त्वावर खोली घेतली होती. खजुरा सात महिन्यंची गर्भवती होती. बुधवारी (२ जुलै) सकाळी सुरेश कामावर गेला.

त्यावेळी ती एकटीच घरात होती. पती कामावर गेल्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी तिचा पती कामावरुन घरी आला. त्याने दरवाजा वाजविला. तेव्हा तिने प्रतिसाद न दिला नाही. अखेर रहिवाशांच्या मदतीने दरवाजा तोडून पतीने प्रवेश केला. तेव्हा पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी दिली भेट

खजुराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णलयात पाठविण्यात आला. पोलिसांनी घराची पाहणी केली. तेव्हा तिने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिट्ठी सापडली. ‘मी जीवनाला कंटाळले आहे. माझी कोणाविरुद्ध तक्रार नाही,’ असे तिने चिठ्ठीत म्हटले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×